उद्देश –
- जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे.
- प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.
धोरण –
कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे अनुदान या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:
- ट्रॅक्टर
- पॉवर टिलर
- ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
- बैल चलित यंत्र/अवजारे
- मनुष्य चलित यंत्र/अवजारे
- प्रक्रिया संच
- काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
- फलोत्पादन यंत्र/अवजारे
- वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
- स्वयं चलित यंत्रे {Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra }
भाडे तत्वावरील सुविधा केंद्र –
- कृषि अवजारे बँकेची स्थापना
- उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना
कृषी यांत्रिकीकरण योजना पात्रता
- शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
- शेतकऱ्याकडे 7/12 उतारा व 8 अ असावा.
- शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक.
- फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार.
- कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक.
- एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील 10 वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल. उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन 2018-19 मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील 10 वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन 2019-20 मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील
कृषी यांत्रिकीकरण योजना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- ८ अ दाखला
- खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
- जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
- स्वयं घोषणापत्र
- पूर्वसंमती पत्र