ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी सुरु

महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी कुसुम सौर कृषी पंप ऑनलाईन नोंदणी अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) पोर्टलला भेट दिल्या नंतर उजव्या महाकृषि ऊर्जा अभियान या बॉक्स मध्ये “महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी” लिंक वर क्लिक करा किंवा खालील थेट लिंक वर क्लिक करा.

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

नवीन ऑफग्रीड सौर पंप किंवा जुना डिझेल पंप सौर पंपाने बदलण्यासाठी नोंदणी अर्जामध्ये खालील प्रमाणे आपला आवश्यक तपशील भरायचा आहे.

कुसुम सौर कृषी पंप नोंदणी अर्ज भरल्या नंतर पुढे आपल्याला सौर कृषी पंपाचा उपलब्ध कोटा दाखवला जाईल, त्यानंतर १०० रुपये ऑनलाईन नोंदणी पेमेंट करायचे आहे.

कुसुम लाभार्थी लॉगिन:

कुसुम सौर कृषी पंप ऑनलाईन नोंदणी पेमेंट केल्यानंतर आपल्याला कुसुम लाभार्थी लॉगिनसाठी युजरनेम/अप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड दिला जाईल त्याने लॉगिन करून पुढील प्रकिया करायची आहे.

https://kusum.mahaurja.com/beneficiary

सर्व शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर कुसुम लाभार्थी लॉगिन मध्ये कागदपत्रे अपलोड करणे, पेमेंट करणे इत्यादी प्रकिया करण्यासाठी पर्याय उपलब्ध केले जातील.