Lampi Virus Details in Marathi : शेतकरी मित्रांनो, सध्या सगळीकडे माजलेला हाहाकार म्हणजे Lampi Virus होय. नेमकं Lampi Virus किंवा Lampi Skin Disease काय आहे ? या रोगाची मुख्य कारण काय ? लक्ष्यण काय ? यासाठीच्या काय उपाय योजना करायला हव्या याबदल आपण सर्व माहिती आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.
भारतामध्ये जवळपास आठ राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशामध्ये लंपी Virus या आजारामुळे आतापर्यंत 7300 हून अधिक जनावरांचा मृत्यू झालेला आहे. Lampi रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत लसीकरणाला गती देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे यासंदर्भातील सूचना शेतकरी वर्ग व पशुपालकांना देण्यात आल्या आहेत.
लंपी एक त्वचारोग असून, गाठदार प्रकारचा रोग आहे. या रोगाला LSDV ( Lampi Skin Disease Virus ) असे सुद्धा म्हणतात. Lampi Skin Disease फक्त गोवंश म्हणजेच गाय व महिष म्हणजेच म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे. हा रोग कीटकांपासून जनावरांना होतो.
त्याचप्रमाणे माशा किंवा डासाच्या विशिष्ट प्रजातीच्या माध्यमातून हा रोग पसरतो. या रोगामुळे सामान्यतः जनावरांमध्ये ताप येणे, त्वचेवर गाठी येणे अशा प्रकारचे विविध लक्षणे दिसून येतात व परिणामी त्या पशुंचा मृत्यूदेखील होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे अश्या पशूंना या रोगाचा जास्तीत जास्त धोका आहे, ज्या पशुंना यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झाला नसेल.
लंपी आजार कसा ओळखावा ?
कॅप्रिपॉक्स नावाच्या Virus मुळे पशूंना लंपी नावाचा त्वचा किंवा स्किन रोग होतो. हा आजार सामान्यतः गाय व म्हैस या जनावरांनाचं होतो. यामध्ये गाय अथवा म्हैसीला 104-105 फॅरेनाईट ताप येतो. त्यामुळे त्यांचे खाण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी दुभती जनावरे दूध देणे कमी करतात. अनेकदा जनावरे लंगडतातसुध्दा व पाच ते सहा दिवसानंतर त्यांच्या अंगावर सुरवातीला छोट्या व नंतर मोठ-मोठ्या गाठी येतात. या गाठी मानेवर कासेला अश्या मऊ ठिकाणी येतात.
लम्पी Virus ची लक्षणे
लम्पी या आजाराच्या लक्षणांमध्ये जनावरांना सुरुवातीला ताप येतो. जनावरांची हळूहळू वजन कमी होते तसेच त्यांच्या डोळ्यातून चिकट पाणी टपकते, तोंडातून लाळ पडते, शरीरावर छोट्या-छोट्या गाठी तयार व्हायला सुरुवात होतात. काही पशुंना चारा खाण्यास त्रास होत असल्याचे सुद्धा लक्षात आले आहे परिणामी पशू दूध कमी द्यायला लागतात, या सर्व एकंदरीत कारणामुळे जनावरांची तब्येत खराब होते. Lampi Virus Details in Marathi
लंपी व्हायरस उपाय
- लंपीची लागण झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवणे.
- माश्या, गोचीड, डास असल्यास त्यांना मारुन टाकणे.
- जनावरांवर उवा दिसत असल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाय करावे.
- गोठ्यात वारंवार स्वच्छता ठेवावी.
- जनावरांचा मृत्यू झाल्यास त्यांना उघड्या जागेवर टाकून न देता पुरून किंवा जाळून टाकावे.
- जनावरांच्या संपूर्ण गोठ्यात कीटकनाशकांची फवारणी करावी.
- गाय व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येऊ नये.
लॅम्पी त्वचा रोग माणसांना पण होऊ शकतो का ?
पशुवैद्यकीय अधिकारण्यांमार्फतच्या माहितीनुसार लॅम्पी रोग फक्त पशुनाच होऊ शकतो.
लॅम्पी त्वचा रोगावर काही उपाय आहे का ?
सध्या प्राथमिक उपचार सांगण्यात आले आलेत. त्याबदची प्राथामिक लससुद्धा तयार आहे लवकरच चाचणी करण्यात येईल.