ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भूमि अभिलेख विभाग सरळसेवा भरती परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबर २०२२ ला होणार !

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ (नूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता दिनांक ०९/१२/२०११ रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्याकामी सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक २२/०४/२०११ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार शासनाकडून निवडण्यात आलेल्या पॅनेलवरील एका कंपनीमार्फत पदभरती प्रक्रिया राबविण्याचे विभागाने योजिले होते. त्यानुसार सदर कंपनीमार्फत दिनांक ०२/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ या कालावधीत उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी व अर्ज स्विकृतीचे काम करण्यात आलेले आहे..

भूमि अभिलेख विभागातील पदभरतीकामी निवडलेल्या कंपनीमार्फत शासनाच्या इतर विभागातील आयोजित परीक्षांच्या बाबतीत अनियमितता आढळलेने शासनाकडून सदर पदभरती प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आलेली होती.

दिनांक ०९/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची माहिती (DATA) सदर कंपनीकडून विभागाकडे हस्तांतरीत करुन घेण्यात आलेला होती. सदर DATA ची प्राथमिक तपासणी केली असता भूमि अभिलेख विभागातील भूकरमापक तथा लिपीक पदाकरीता जाहिरातीत नमुद अर्हता धारण न करणाच्या उमेदवारांनी देखील अर्ज सादर केल्याचे दिसून आले. तसेच उमेदवारास कोणत्याही एकाच विभागाकरीता अर्ज सादर करण्याबाबत सुचना असून देखील काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक विभागाकरीता अर्ज सादर केलेले दिसून आले. या कारणास्तव विभागाकडून दिनांक २८/०२/२०२२ ते १३/०३/२०२२ या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येवून दुबार अर्ज भरलेल्या उमेदवारांना कोणत्याही एकाच विभागातील अर्ज कायम करण्याची तसेच अर्हता धारण करत असल्याबाबत प्रमाणपत्रे अपलोड करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली होती.

छाननी अर्ज प्रतियेच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या सुचनांनुसार ज्या उमेदवारांनी दिनांक ०२/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत त्यांनी छाननी अर्ज प्रक्रिया पुर्ण करणे आवश्यक असल्याचे तसेच छाननी अर्ज प्रक्रिया पुर्ण करणाच्या उमेदवारांनाच पदभरती प्रक्रियेतील परीक्षेत बसण्याकरीता पात्र करण्यात येईल व जे उमेदवार अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड करून छाननी प्रक्रिया पुर्ण करणार नाहीत अशा उमेदवारांना पदभरती परीक्षेकानी अपात्र समजणेत येईल. अशी स्पष्ट सुचना एस एम एस द्वारे तसेच विभागाकडून देण्यात आलेली होती.

छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवार यांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येवून भूमि अभिलेख विभागातील गट क पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार जाहीरातीत नमूद केलेल्या अर्हते ऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्रे अपलोड केलेली आहेत. अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपुर्ण प्रक्रिये अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (Computer Based Teat) दिनांक २८/११/२०१२ ते ३०/११/२०२२ या कालावधीत IBPS कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबत संभाव्य वेळापत्रक खालील प्रमाणे असेल.

दि. २८/११/२०२२ दि. ३०/११/२०२२ दि.३०/११/२०२२
सत्र- १ सत्र २ सत्र- १ सत्र २ सत्र- १
पुणे विभाग कोकण (मुंबई) विभाग औरंगाबाद विभाग नाशिक व अमरावती विभाग नागपुर विभाग

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधीत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेण्याचे असून प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे. सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक ०४/०५/२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने (Computer Based Test) परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्यामुळे उमेदवाराचे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असू शकते.