धानोरा:-तालुक्यातिल रांगी परिसरातील शेतकर्याना सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने धानाची लागवड करताना मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची पेरणी केलेली आहे. सध्या हलके धान पिक कापणीला आले. मात्र दररोज पडणाऱ्या पावसामुळे धान कापणी होवू शकत नाही.उभ्या धानपिकाला पावसाने झोडपल्याने अनेक शेतकऱ्यांचे हलके धान झोपले.दररोजच्या पावसाने बांधितिल पाणि बाहेर काढणे शक्य नसल्याने मोठ्या प्रमाणात धान्याची नासाडी होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे .शेतकऱ्याचे हलके धान पीक हाती येण्याच्या मार्गावर असताना परतीचा पाऊस थांबता थांबत नसल्याने कापणी व बांधणीचि कामे प्रभावित झाली आहेत .मध्यम व जड प्रतीचे धानपिक निसवत आहेत. निसवा सुरू असतानाच पिकावर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी महागडी औषधी खरेदी करून फवारणी करीत आहेत .मात्र फवारणी केल्यानंतरही काही कालावधित पाऊस येत असल्याने केलेली फवारणी निरओपयोगी ठरत आहे. परिणामी रोगाची तीव्रता वाढत चालली आहे .निसर्गाच्या प्रकोपाचा दरवर्षी बळीराजाला सामना करावा लागत आहे. पीक हाती येईपर्यंत शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. तालुक्यातील काही भागात सिंचन सुविधा पुरेपूर नसल्याने व पाण्यावर शेती करावी लागते त्यामुळे अनेक शेतकरी हलक्या धानाचे उत्पादन घेतात. मात्र यावर्षी पाऊस शेतकऱ्यांच्या पिच्चा सोडत नसल्याने धान कापणी व बांधणीची कामे कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यासमोर पडलेला आहे .परतीच्या पावसामुळे उभे धान पीक खाली कोसळले आहे .परिपक्व झालेले धानपिक सडुन जात आहेत. (सुनिल तुकाराम चलाख रांगी यांच्या शेतातिल पावसाने सडत असलेले धान पिक)
Related Articles
शक्ति सदन योजना
राज्यातील वंचित, संकटग्रस्त महिलांसाठी केंद्र पुरस्कृत “उज्ज्वला” व “स्वाधार” या योजनांची अंमलबजावणी सन २०१६ पासून करण्यात येत आहे. शासन निर्णयान्वये केंद्र पुरस्कृत स्वाधार योजनेंतर्गत राज्यातील निराधार, निराश्रित, नैसर्गिक आपत्तीत / कौटुंबिक हिंसाचारामध्ये बेघर झालेल्या महिला व त्यांच्या बालकांना अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय मदत, कायदेविषयक समुपदेशन तसेच हेल्पलाईनव्दारे मार्गदर्शन, समुपदेशन उपलब्ध करुन देण्यात येते. तसेच […]
विधानसभा निवडणुकीसाठी २ लाखांहून अधिक शाईच्या बाटल्या
विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात येत आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांमध्ये १ लाख ४२७ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. २ […]
पेरमिली येते जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रम साजरा : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा हस्ते उदघाटन
दिनांक 08/03/2023 रोज बुधवार ला पेरमिली येथील पटवारी भवनात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान बचत गट महिला प्रभाग संघ पेरमिली यांच्या मार्फतीने जागतिक महिला दिन आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उदघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष( Ajaykankdalwar )श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमालाउमेद गटाचे 170 महिलां बचत गट उपस्थित होते, महिला दिनानिमित्त गावातील […]