गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

लॉयड मेटल्स च्या कर्मचाऱ्यांनी गरजू गर्भवती महिलेला ए बी निगेटिव्ह हे दुर्मिळ रक्तगटाचे रक्त पुरवून जपले सामाजिक जाणीव

अहेरी:-
सुशीला आऊलवार या गर्भवती महिलेला AB- रक्ताची अत्यंत गरज होती त्यांना अहेरी ग्रामीण रुग्णालयातून गडचिरोली येथे स्थानांतर करण्यात आले मात्र रक्त न मिळाल्याने ते परत अहेरी ला आले संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात सोशल मीडिया च्या माध्यमातून ३ दिवस सुचिता खोब्रागडे साई तुलसीगिरी व संजय आक्केवार यांनी अनंत प्रयत्न केले मात्र दुर्मिळ रक्तगट असल्याने कुठेच मिळेना मग सुशीलाजी ने टायगर ग्रुप ला संपर्क केला मग ग्रुपच्या सदस्यांनी सी-६० , एसआरपीफ अश्या सगळ्या ठिकाणी विचारपूस केली अखेरीस लॉयड्स मेटल्स कंपनी चे अधिकारी श्री विनोद कुमार सर यांना संपर्क केले कंपनी मध्ये एकूण ७ AB – ब्लड ग्रुपचे कर्मचारी आहे अशी माहिती विनोद सरांनी दिली तत्काळ रक्तदान करायला निरप्राज जाह हे अहेरी येथील ग्रामीण रुगणालयात येऊन त्यांनी त्या अत्यावश्यक गरजु गर्भवती महीले करीता रक्तदान केले .सामाजिक जाणिव जपली यावेळी

उपस्थित विनोद कुमार , संजय भाऊ अक्केवार व टायगर ग्रुप आलापल्लीचे प्रमुख साई भाऊ तुलसीगारी,धनराज चक्रमवार .आदी नी विशेष परिश्रम घेतले.