शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी ! लवकरच राज्यात मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली जाणार आहे. राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देण्याची योजना अमलात आणली आहे.
Mukhya Mantri Kisan Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रु. इतकी रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यात लवकरच ” मुख्यमंत्री किसान योजना ” लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या निर्णयाचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवर मुख्यमंत्री किसान योजना लागू होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी पात्र असतील अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये इतकी अनुदान (subsidy) रक्कम शासनामार्फत देण्यात येईल.
हे सुध्दा वाचा : शेतकऱ्यांना बाप्पा पावला ! अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत पुढील 2 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात
सन 2018 पासून केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली. किसान संबंधित योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपये याप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये इतकी रक्कम मानधन स्वरूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर (Bank Account) ट्रान्सफर केली जाते.
याच योजनेच्या संकल्पनेवर आधारित मुख्यमंत्री किसान योजना राज्यात राबविण्यासाठी 3 दिवसापूर्वी बैठक झाली होती व अंतिम शिक्कामोर्तब या योजनेसाठी करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांसाठी ही खूपच आनंदाची बाब ! यामध्ये महत्त्वाचे अट म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात येणार आहे.