LokM

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पदव्युत्तर वैद्यकीय व दंतवैद्यकीय प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक, गुणवत्ताधारित होणार – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. १०: पदव्युत्तर वैद्यकीय व दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गुणवत्ताधारित करण्यासाठी सर्व प्रवेश केंद्रीकृत ऑनलाइन प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी नव्या नियमांची माहिती घेऊन त्यानुसार प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. राज्य शासनाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिसूचना जारी करून पूर्णवेळ व्यावसायिक पदव्युत्तर वैद्यकीय व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन व स्वागत

नाशिक, दि. ११ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी समवेत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा (विदर्भ, तापी व कृष्णा खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुख्यमंत्री व मंत्री महोदयांचे स्वागत केले. यावेळी आमदार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्यासह पशुधनाच्या चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक तंत्रज्ञानाधारित दुष्काळी मदतीचे नियोजन याला प्राधान्य मुंबई, दि. ११ – राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील सहा ते आठ महिने अधिक आधार देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी रोजगारनिर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचविणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा-पाणी उपलब्ध करून देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मूलचेरा ग्रामीण रुग्णालयातील सुविधांच्या अभावावर गौरव बाला यांचा आवाज; आरओ पाणी, रिक्त पदे आणि जागेच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित

शिवसेना शिंदे गटाचे मूलचेरा तालुकाप्रमुख गौरव बाला यांची रुग्णालयाला भेट; वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता साळवे यांच्याशी चर्चा डॉ. स्मिता साळवे यांचे आश्वासन — “समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू.” मूलचेरा, दि. ११ ऑक्टोबर : गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधांशी संबंधित विविध समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?

सध्या इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ आता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून व्यवहार्यता तपासली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण विभागाला दिले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ताजा, सकस आणि दर्जेदार आहार वेळेत मिळावा यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हास्तरावर देण्याची तयारीही सरकारने […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली असून सराफा बाजारात पुन्हा तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचे दर जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. 10 ऑक्टोबर 2026 रोजी देशांतर्गत बुलियन मार्केटच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. स्थानिक कर, उत्पादन शुल्क आणि दागिन्यांच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लोखंडी मंडप कोसळून चिमुकल्यासह वृद्ध गंभीर जखमी

अहिल्यानगर शहरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू असतानाच एक दुर्दैवी घटना घडली आहे. पाईपलाईन रोडवरील श्री तुळजाभवानी मंदिराजवळ रस्त्यावर उभारण्यात आलेला लोखंडी मंडप अचानक कोसळल्याने दुर्घटना घडली. या घटनेत एका लहान मुलासह वयोवृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, दोघांवरही परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंडप उभारण्याच्या कामात हलगर्जीपणा झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यातील १,०५८ आश्रमशाळांमध्ये एकाच दिवशी पट पडताळणी आदिवासी विकास विभागाची राज्यव्यापी विशेष मोहीम यशस्वी

मुंबई, दि. ९ : आदिवासी विकास विभागाच्या वतीने राज्यातील शासकीय व अनुदानित अशा एकूण १,०५८ आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येची अचूकता तपासण्यासाठी एकाच दिवशी विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ५०० शासकीय आणि ५५८ अनुदानित आश्रमशाळांचा समावेश होता. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि शालेय अभिलेखांतील नोंदी यांची पडताळणी करण्यासाठी आदिवासी विकास आयुक्तालयामार्फत या मोहिमेचे नियोजन करण्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आधुनिक फीड तंत्रज्ञानातून मत्स्यपालनाला नवी दिशा – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. ९ :  मत्स्यव्यवसाय व ॲक्वाकल्चर क्षेत्राची उत्पादकता, कार्यक्षमता, शाश्वतता आणि नफा वाढविण्यासाठी आधुनिक पोषण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील सागरी व मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व कार्यपद्धतींच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान त्यांनी येथील नेक्सजेन फीड्स या अत्याधुनिक उत्पादन व अॅक्वाकल्चर सोल्युशन्स केंद्राला भेट दिली. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यात मानसिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणार – मंत्री प्रकाश आबिटकर टेली-मानस हेल्पलाइनला ३ लाख २७ हजारांहून अधिक कॉल्स

स्मृतीदोष क्लिनिकमधून दरवर्षी ४५ हजारांहून अधिक नागरिकांना लाभ मुंबई, दि. ९ : मानसिक आरोग्याविषयी जनजागृती, समुपदेशन आणि उपचार सेवा अधिक सुलभ करण्यासाठी राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. टेली-मानस हेल्पलाइन, मनशक्ती क्लिनिक, स्मृतीदोष क्लिनिक आणि मनोसामाजिक पुनर्वसन सेवांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवांचे जाळे बळकट करण्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा भर आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन […]