ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लोकरथ महत्वाच्या बातम्या

म्हाडाच्या 4752 घरांची सोडत: म्हाडा कोकण मंडळाच्या 4 हजार 752 घरांची 10 मे रोजी सोडत, 8 मार्चपासून अर्ज विक्री-स्वीकृतीला सुरूवात; 12 एप्रिल अर्ज भरण्याची अंतिम तारीख

शेअर बाजार: सेन्सेक्स 415 अंकांच्या वाढीसह 60,224.46 अंकांवर बंद तर निफ्टी 117 अंकांच्या उसळीसह 17,711.45 या पातळीवर बंद

हसन मुश्रीफांना धक्का! हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणाची अटकपूर्व जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली, कोर्टात 10 मार्चला सुनावणी

छत्तीसगडमध्ये अंगणवाडी सेविकांचा पगार वाढला: 1.21 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर; अंगणवाडी सेविकांचा पगार 10 हजार व मदतनीसांचा पगार 5 हजार तर बेरोजगारांना 2,500 बेरोजगारी भत्ता मिळणार

निकोबार बेट भूकंपाने हादरले: आज सोमवारी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी 5.0 रिश्टर स्केलचा भुकंप, भुकंपाची खोली जमिनीखाली 10 किलोमीटरपर्यंत

सोने-चांदी दर: आज 24 कॅरेट प्रति तोळा सोन्याचा दर 56 हजार 550 रुपये तर 22 कॅरेट प्रति तोळा सोन्याचा दर 51 हजार 850 रुपये

अभिनेत्री अमृता खानविलकरचा सोशल मीडियावरून ब्रेक, म्हणाली, “लवकरच तुम्हाला पुन्हा भेटेल… परत येण्यासाठी योग्य वेळेची प्रतिक्षा! मी ब्रेक घेत आहे..”