महाडीबीटी वर दिलेल्या शिष्यवृत्ती साठी आपल्याला जे दस्तावेज लागणार आहेत, ते आपण आपल्या जवळ असलेल्या सुरेटा नोकरी मदत केंद्र मधून किव्हा आपल्या जवळ असलेल्या एखादया ऑनलाईन सेंटर मधून काढू शकता. तसेच सेतू मधूनही हि कागदपत्रे काढता येतात. तर आपल्याला शिष्यवृत्ती साठी कोण-कोणती कागदपत्रे लागणार आहेत. व ती कागदपत्रे काढण्यासाठी आपल्याला काय-काय द्यावे लागणार आहे. हे आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
शिष्यवृत्ती साठी लागणारे दस्तावेज :
- मागील वर्षाची मार्कशीट
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र (तहसीलचे)
- जात प्रमाणपत्र
- नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र (SC आणि ST साठी नाही)
- मार्कशीट (SSC, HSC ज्या वर्गात शिकत आहात ते )
- शाळा सोडल्याचा दाखला
- आधार कार्ड
- बँक खाते पासबुक
- रहिवासी प्रमाणपत्र
- वसतिगृहात राहत असल्यास त्याची पावती
- रु.१००च्या स्टॅम्प वर गॅप सर्टिफिकेट (गॅप असल्यास)
- शाळा / कॉलेज प्रवेश पावती
हि प्रमाणपत्रे काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र (तहसीलचे) : तलाठ्याचा उत्पन्न दाखला, आधार कार्ड झेरोक्स, तलाठी /ग्रामसेवक/सरपंच रहिवासी दाखला, रेशन कार्ड झेरोक्स, पासपोर्ट साईज २ फोटो, मतदान कार्ड झेरोक्स,७/१२ किंव्हा वेतन प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र : स्वतःचे आधार कार्ड झेरोक्स, वडिलाचे आधार कार्ड झेरोक्स, स्वतःचा शाळेचा दाखला, वडिलाच शाळेचा दाखला, आजोबाचा शाळेचा दाखला, कोतवाल बुक नक्कल, कुटुंबातील एकाचे जात प्रमाणपत्र, अर्जदाराने स्वतः हून अर्ज सादर करावा.
- नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र (SC आणि ST साठी नाही) : स्वतःचा शाळेचा दाखला, स्वतःचा जातीचा दाखला, वडिलांचा शाळेचा दाखला, आजोबांचा शाळेचा दाखला/जातीचा दाखला, तहसील कार्यालयाचा तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवाशी दाखला, दोन पासपोर्ट साईज फोटो आणि प्रतिज्ञापत्र.
- रहिवासी प्रमाणपत्र : रेशनकार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड