महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्कॉलरशिप चे पैसे वेळेवर मिळावे या उद्देशाने MAHA DBT पोर्टल विकसित केले असून या पोर्टल च्या माध्यमाने सर्व विध्यार्थी नोंदणी फार्म भरुन याचा लाभ घेतात.
मात्र नवीन विद्यार्थ्यांना लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज असते आधार verify करण्यासाठी Biomatric व OTP असे दोन माध्यम आहे. मागील वर्षापासून Biomatric सेवा बंद असून सद्या आधार verify करण्यासाठीं OTP सेवा उपलब्ध आहे.आधार ला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवले जाते त्यावेळेस Massage:failed to process adhar OTP verification please try later या पद्धतीचे मॅसेज येत असुन विद्यार्थ्यांना फार्म भरणे कठीन होत आहे.
OTP व बायोमेट्रिक सेवा सुरळीत चालू असती तर फार्म भरणे झाले असते.
वारंवार ऑनलाइन सेवा केंद्राचे चकरा मारून सुद्धा फार्म भरणे होत नाही.
महाविद्यालय स्तरावरून विद्यार्थ्यांना लवरक फार्म भरा अशे सांगण्यात येते. मात्र अशी अडचणी येत असल्याने समस्यांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बीगडत आहे.