Mahadbt Farmer Scheme Apply Online – ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावर शेततळ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022-23 व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे व वैयक्तीक शेततळे अस्तरीकरण या घटकासाठी अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी आहे.
Mahadbt Farmer Scheme Apply Online
अभियानांतर्गत सामूहिक शेततळे या घटकासाठी फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा तसेच दुष्काळी भागामध्ये फलोत्पादन पिकाच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी 100 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. (Mahadbt Farmer Scheme Apply Online)
सामूहिक शेततळे घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. तसेच वैयक्तीक शेततळे अस्तरीकरणासाठी पाण्याचा साठा निर्माण करणे व साठविलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये, पाणीटंचाईच्या काळात फळबाग जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा, या उद्देशाने 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनांतून शेततळ्याचे खोदकाम केले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना शेततळ्याच्या आकारमानानिहाय अनुदान देण्यात येणार आहे.
MahaDBT अर्ज भरण्यास सुरू
इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी फलोत्पादनाच्या नोंदीसह सात-बारा उतारा, संवर्ग (अनुसूचित जाती/ जमाती) प्रमाणपत्राची छायांकित प्रत, हमीपत्र, स्थळपाहणी अहवाल व पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह कृषी विभागाच्या https://mahadbtmahait.gov. in / farmer / login या संकेतस्थळावर अर्ज सादर करणे आवश्यक आहे.