ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

वन विभाग भरती सुधारित वेळापत्रक जाहीर

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील ( महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ) गट – ब ( अराजपत्रित ), गट – क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरणेबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर.

भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील ( महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट – ब ( अराजपत्रित ), गट – क व गट ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरताना यापुढे स्पर्धा परिक्षा टि.सी.एस. आयओएन ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेक ) व आय.बी.पी.एस. ( इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन ) या कंपनीमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेण्यास शासन निर्णय निर्गमित केला आहे. तसेच सदर शासन निर्णयान्वये परीक्षा शुल्क, कंपनीशी करावयाचा सामंजस्य करार याबाबतच्या सुधारीत तरतुदी दिलेल्या आहेत.

वनविभागातील ज्या संवर्गाची बिंदूनामावली मुख्य वनसंरक्षक ( प्रा. ) / वनसंरक्षक ( प्रा. ) किंवा त्यांचे अधिनस्त वनविभाग स्तरावर आहे त्या संवर्गाची भरती प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ४/५/२०२२ व दिनांक २१/११/२०२२ मधील सुचनांचे अनुषंगाने राबविणेकरीता या कार्यालयाचे पत्राअन्वये खालीलप्रमाणे कालबध्द कार्यक्रम आखून देण्यात आला होता.

अ.क्र. टप्पा कालमर्यादा
1 सर्व संवर्गाची बिंदुनामावली मंजूर करून घेणे १०/१२/२०२२ पर्यंत
2 सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २१/११/२०२२ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार ऑनलाईन भरतीप्रक्रियेसाठी टि.सी. एस . आयओएन ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेक ) किंवा आय.बी.पी.एस. ( इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन ) या कंपनीशी करार करणे १०/१२/२०२२ पर्यंत
3 जाहिरात प्रसिध्द करणे २०/१२/२०२२ पर्यंत
4 अर्ज स्विकारणे ३१/१२/२०२२ पर्यंत
5 ऑनलाईन परीक्षा घेणे १०/१/२०२३ ते २०/१/२०२३
6 ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहिर करणे ३०/१/२०२३ पर्यंत
7 शारीरिक चाचणी / व्यावसायिक चाचणी ( ज्या पदासाठी आवश्यकता आहे त्यासाठी ) घेणे १०/२/२०२३ ते २०/२/२०२३
8 अंतिम निवडसूची जाहिर करणे २८/२/२०२३ पर्यंत
9 नियुक्ती आदेश निर्गमित करणे ०५/०३/२०२३ पर्यंत

तथापी असे आतापर्यंत क्षेत्रीय स्तरावर बहुतेक संवर्गाच्या बिंदूनामावल्या अद्याप मागासवर्गीय कक्षाकडून मंजुर करुन घेण्यात आलेल्या नाहीत. तसेच शासन पत्राअन्वये वनविभागातील भरती प्रक्रियेसाठी टि.सी.एस. आयओएन ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेक ) सोबत करार करण्यास शासनाने मान्यता दिली असून करार करण्याची कार्यवाही या कार्यालयाचे स्तरावर सुरु आहे. सद्याची परिस्थिती विचारात घेता वरीलप्रमाणे कार्यक्रमानुसार दिनांक २०/१२/२०२२ रोजी जाहिरात देणे शक्य नाही. करीता वरील कालबध्द कार्यक्रम रद्द करण्यात येत असून भरती प्रक्रियेकरीता सुधारीत कार्यक्रम खालीलप्रमाणे आखून देण्यात येत आहे.

वन विभाग भरती सुधारित वेळापत्रक जाहीर – MahaForest Recruitment 2022-23:

अ.क्र. टप्पा कालमर्यादा
1 सर्व संवर्गाची बिंदुनामावली मंजूर करून घेणे २६/१२/२०२२ पर्यंत
2 शासन, महसूल व वनविभाग पत्र दिनांक ९/१२/२०२२ अन्वये प्राप्त मान्यतेनुसार भरती प्रक्रियेसाठी टि.सी.एस. आयओएन ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेक ) या कंपनीशी करार करणे ( या कार्यालयाचे स्तरावर ) ३१/१२/२०२२ पर्यंत
3 जाहिरात प्रसिध्द करणे १५/०१/२०२३ पर्यंत
4 अर्ज स्विकारणे ३१/०१/२०२३ पर्यंत
5 ऑनलाईन परीक्षा घेणे १/२/२०२३ ते २०/२/२०२३
6 ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहिर करणे २५/२/२०२३ पर्यंत
7 शारीरिक चाचणी / व्यावसायिक चाचणी ( ज्या पदासाठी आवश्यकता आहे त्यासाठी ) घेणे ५/३/२०२३ ते २०/३/२०२३
8 अंतिम निवडसूची जाहिर करणे १५/४/२०२३ पर्यंत
9 नियुक्ती आदेश निर्गमित करणे ३०/४/२०२३ पर्यंत