गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

महाराजस्व अभियानाचा नागरिकांना लाभ आ धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन

मुलचेरात पार पडली शासकीय योजनांची जत्रा

मुलचेरा:-* राज्यशासनाने दैनदिन प्रश्न निकाली काढून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी राज्यभरात ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून स्थानिक महसूल प्रशासनातर्फे अतिदुर्गम व आदिवासीबहुल भागात शिबीर घेऊन शेवटच्या घरापर्यंत विविध लोककल्याणकारी योजना पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतल्याने नक्कीच या महाराजस्व अभियाचा नागरिकांना मोठा लाभ झाल्याचे प्रतिपादन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
मुलचेरा महसूल प्रशासनातर्फे तालुका मुख्यालयातील तहसील कार्यालयाच्या भव्य पटांगणात आयोजित शेवटचा महाराजस्व अभियान शिबीराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी
अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम,प्रमुख पाहुणे माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,नगराध्यक्ष विकास नैताम,उपाध्यक्ष मधुकर वेलादी,सरपंच भावना मिस्त्री,माजी पंचायत समिती सभापती सुवर्णा येमुलवार, तहसीलदार सर्वेश मेश्राम,नायब तहसीलदार राजेंद्र तलांडे,गटविकास अधिकारी एल बी जुवारे,कृषी अधिकारी विकास पाटील,बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद हटकर,कृषी अधिकारी पंचायत युवराज लाकडे,गटशिक्षणाधिकारी गौतम मेश्राम,ठाणेदार अशोक भापकर,वनपरिक्षेत्र अधिकारी भावना अलोने,मार्कंडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत,माजी सरपंच ममता बिश्वास,नगर सेवक उमेश पेळूकर,जेष्ठ नागरिक गणपत मडावी,जेष्ठ नागरिक शंकर हलदार,नगरसेवक दिलीप आत्राम,ग्रामपंचायत सदस्य निखिल इज्जतदार,राकॉचे जेष्ठ रंजित मंडल,नगरसेविका सपना मडावी,नगरसेविका मनीषा गेडाम,नगरसेविका मंगला आलाम आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना 1992 ला चामोर्शी तालुक्याचे विभाजन करून मुलचेरा तालुक्याची निर्मिती करण्यात आली.तेंव्हापासून तालुक्यात विविध विकासात्मक काम करण्यावर आपलं प्रयत्न राहिला आहे.तालुक्यातील बंगाली बांधवांच्या जमिनीचा प्रश्न असो,महावितरण विभागाच्या अडचणी असो,मुख्य रस्ते, नदी-नाल्यावर पूल असे अनेक प्रश्न अजूनही आवासून आहेत.ते सुद्धा प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न सुरू असून तीन तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणारा देवदा नाल्यावरील पुलाचे काम लवकरच सुरू होणार असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी सोयीचे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थित मान्यवरांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.शिबिराचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांनी तालुक्यातील 5 ठिकाणी आयोजित महाराजस्व अभियानात महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्फूर्तीने काम केल्याने नागरिकांचाही उस्फुर्त प्रतिसाद लाभला आहे.त्यामुळे सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी असेच प्रयत्न केल्यास नागरिकांचे सर्वच प्रश्न सुटणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
तालुक्यात देवदा,गोमनी,अडपल्ली, लगाम आणि 18 मे रोजी तालुका मुख्यालयात शेवटचा महाराजस्व अभियान शिबीर घेण्यात आले.याही शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिबिरात नागरिकांना विविध दाखले,प्रमाणपत्र व शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोमणीचे तलाठी रितेश चिंदमवार यांनी केले.