महाराष्ट्रात 20,000 हजार पोलिसांची पदे भरणार कोणत्या जिल्ह्यात किती जागा?
शिंदे फडवणीस सरकारचा मोठा निर्णय राज्यात लवकरच 20 हजार पोलिसांची पदे भरणार.
शिंदे फडवणीस सरकारने मोठा निर्णय घेऊन महाराष्ट्र राज्य मध्ये तब्बल वीस हजार पोलिसांची पदे भरली जाणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी स्वतः ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे शिंदे व फडवणीस सरकारने या नव तरुण युवकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण देशावर कोविड चे संक्रमण होते व अन्य कारणामुळे मागील दोन वर्षांमध्ये पोलीस भरती रखडली होती त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये लवकरच पोलीस भरती करणार आहोत असे महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आले.
यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी सांगितले की मी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतलेला आहे दोन वर्षाची पोलीस भरती आता आम्ही हाती घेतली असून सुमारे वीस हजार पोलिसांची पदे भरण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि या संदर्भातील कार्यवाही आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून जवळपास साडेसात ते आठ हजार पदाची एक जाहिरात निघालेल्या असून आणखी 12 हजार पदाची एक जाहिरात आम्ही काढणार असून मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती करणार आहोत आणि याचा फायदा पोलीस दलाला निश्चितच होईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
सध्या अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यांमध्ये शहरातील पोलीस विभागामध्ये मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन तातडीने 7000 पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहे आणखी सात हजार पोलिसांची भरती ही लवकरात लवकर केली जाईल आणि त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेली आहे असे यावेळी सांगितले.