ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

कृषी पर्यटन केंद्र चालू करण्यासाठी अटी, केंद्रास मिळणारे लाभ पहा आणि नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करा

भारतात कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. देशातील शेतकरी या दोन्ही पर्यटनाला उत्तम शेतीपूरक व्यवसाय म्हणून सकारात्मक दृष्टिने पाहत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध होणार असून शहरी पर्यटकांना शांत, निसर्गसंपन्न ठिकाणी राहून पर्यटनाचा आनंद मिळू शकणार आहे. कृषी पर्यटन शेती आणि शेतीवर आधारित असल्यामुळे कृषी पर्यटन सुरू करण्यासाठी कमीत कमी एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक शेती क्षेत्र असणे आवश्यक आहे.

नोंदणी केलेल्या कृषी पर्यटन केंद्रास पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळणार आहे. या केंद्रांना वस्तू व सेवा कर, विद्युत शुल्क इतरचा लाभ मिळणार आहे. कृषी पर्यटनाची चांगली छायाचित्रे, व्हीडिओ पर्यटन संचालनालयास दिल्यास त्याची प्रसिद्धी विविध माध्यमांतून करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र कृषी पर्यटन केंद्र ऑनलाइन नोंदणी – Maharashtra Agro Tourism Online Registration:

कृषि पर्यटनासाठी अटी:

१) कृषि पर्यटन केंद्र चालू करण्यासाठी किमान १ एकर शेती क्षेत्र असणे, सात-बारा कुटुंबाच्या नावे असणे आवश्यक.

२) पर्यटकांना भोजन, पाणी, स्वच्छतागृहाची सोय आदी उपलब्ध करुन देणे बंधनकारक.

३) क्षेत्रफळानुसार खोल्यांची संख्या निर्धारीत आहे. कृषि पर्यटन हे एकदिवसीय सहल, निवासी, शिबीर (कँपिंग) आदी पद्धतीचे ठेवता येईल.

४) अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून त्यासोबत जमिनीचा सात बारा, ८ अ, आधार कार्ड, पॅन कार्ड, वीजबील, अन्न परवाना (फूड लायसेन्स) व चलन ही कागदपत्रे देणे आवश्यक.

कृषि पर्यटन केंद्रास मिळणारे लाभ:

१) पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळेल.

२) केंद्र मालकास नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे बँक कर्ज प्राप्त करता येऊ शकेल.

३) पर्यटन धोरण २०१६ मधील प्रोत्साहनांचा उदा. वस्तू व सेवा कर, विद्युत शुल्क (मुद्रांक शुल्क सवलत वगळता) आदींचा लाभ घेता येईल.

४) जलसंधारण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या शेततळे योजनेकरिता.

५) कृषि पर्यटन केंद्रास प्राधान्य देण्यात येईल. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ग्रीन हाऊस, फळबाग.

६) भाजीपाला लागवड यासारख्या योजनांचे फायदे घेता येतील.

७) कृषि पर्यटन धोरणांतर्गत ज्या ठिकाणी घरगुती स्वयंपाकगृह वापरले जाईल त्या ठिकाणी केंद्रांना निवास व न्याहारी योजनेच्या धर्तीवर घरगुती गॅस जोडणी वापरता येईल.

८) वीज आकारणी घरगुती दराप्रमाणे आकारण्याबाबत विचार करण्यात येईल.

कृषी पर्यटन केंद्र नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करा:

कृषी पर्यटन सुरू करण्यासाठी पर्यटन संचालनालयात नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. नोंदणीसाठी महाराष्ट्र पर्यटनाच्या संकेत स्थळावर व प्रादेशिक उपसंचालक पर्यटन संचालनालय कार्यालयात अर्ज करता येणार आहे.

संपर्क : पर्यटन संचालनालय, विभागीय पर्यटन जिल्हा कार्यालय / पर्यटन संचालनालय महाराष्ट्र.