अभिनेते अशोक सराफ त्यांनी अनेक मराठी चित्रपट तसेच थिएटरमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. गेली पन्नासहून अधिक वर्षे ते या इंडस्ट्रीशी जोडले गेलेले आहेत. ‘महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. या पुरस्काराबाबत मला अतिशय आनंद आहे. माझी वयाची पन्नास वर्षे इंडस्ट्रीतील सत्कार्णी लागली असल्याचा आनंद झाला. आतापर्यंत अनेक दिग्ग्जांना हा पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्यासोबत मला पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद असल्याचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी सांगितले.
