ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्र वन विभाग भरती वेळापत्रक जाहीर

भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभागाने दि. ४/५/२०२२ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या आहेत. आता सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय दिनांक २१/११/२०२२ अन्वये भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याताना यापुढे स्पर्धा परिक्षा टि.सी.एस.- आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिनिटेक) व आय.बी.पी.एस. (इंस्टिट्युट ऑफ बैंकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार ऑनलाईन पध्दतीने स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी यापैकी कोणत्याही एका कंपनीची आवश्यकतेनुसार निवड करावयाची आहे. तसेच सदर शासन निर्णयान्वये परीक्षा शुल्क, कंपनीशी करावयाचा सामंजस्य करार याबाबतच्या सुधारीत तरतुदी दिलेल्या आहेत..

२. त्यानुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २१ / ११ / २०२२ च्या शासन निर्णयातील कार्यपध्दती / तरतुदी यांची तपासणी करुन भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत आवश्यक कार्यवाही करणेबाबत शासनाने संदर्भ ३ वरील पत्रान्वये सुचीत केले आहे..

३. उपरोक्त सुचनांचे अनुषंगाने कळविण्यात येते की, वनविभागातील सरळसेवेने भरती करावयाच्या पदांची यादी यासोबत जोडली आहे. सदर पदांपैकी ज्या संवर्गाची बिंदूनामावली मुख्य वनसंरक्षक (प्रा.) / वनसंरक्षक (प्रा.) किंवा त्यांचे अधिनस्त वनविभाग स्तरावर आहे त्या संवर्गाची भरती प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ४/५/२०२२ व दिनांक २१/११/२०२२ मधील सुचनांचे अनुषंगाने राबविणेकरीता खालीलप्रमाणे कालबध्द कार्यक्रम आखून देण्यात येत आहे.