केंद्रशासन व राज्यशासनाकडून देशातील गोरगरीब नागरिकांसाठी विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. यापैकी काही योजना फक्त महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या असून त्यामध्ये महिला कर्ज, बचतगट, गृहउद्योग, स्वयंरोजगार इत्यादी योजनांचा समावेश आहे. आज आपण सदर लेखाच्या माध्यमातून महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना बद्दलची माहिती सविस्तर पाहणार आहोत. महिलांच्या सबलीकरणासाठी, व्यवसायात पुढाकार घेण्यासाठी व आर्थिक दर्जा वाढवण्यासाठी महिलांना या विविध योजनांचा नक्कीच फायदा होणार आहे.
महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना
राज्य किंवा केंद्रशासनाकडून महिलांसाठी विविध योजना राबविण्याचा मुख्य हेतू म्हणजे त्यांना त्यांच्या पायावरती उभा राहता यावं, जेणेकरून कुटुंबाची जबाबदारी व इतर मूलभूत गरजा त्यांना स्वतः भागवता येतील. या विविध बाबींचा विचार करून महिलांच्या कामाशी निगडित जसे भरतकाम, शिवणकाम, विणकाम, पिठाची गिरणी अशा विविध योजनांचा समावेश शासनाकडून करण्यात आला आहे.
महिलांना व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांना स्वावलंबी बनवणे, सक्षमीकरणाला चालना देणे हा शासनाचा विविध योजना राबविण्या मागचा मुख्य हेतू आहे. पारंपारिक विचार केला, तर मुलींना समाजात कमी मान दिला जातो. लहानपणापासून त्यांच्यावर दबाव टाकलं जातं, घराबाहेर पाठवले जात नाही. त्यांना सुद्धा पुरुषांइतकाच सन्मान मिळावा; म्हणून महिलांसाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात.
महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना कोणत्या ?
तसं पाहायचं झालं, तर महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना राज्य व केंद्र शासनाकडून राबविण्यात येतात. ज्यामध्ये महिलांना व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या योजना, महिलांना व्यवसायासाठी उपकरण किंवा वस्तू देणाऱ्या योजना, महिलांना प्रवासात सूट देणाऱ्या योजना, महिलांना प्रसूतीपश्चात लाभ देणाऱ्या योजना, मुलींना लाभ देणाऱ्या योजना, गर्भवती महिलांसाठी योजना इत्यादी विविध योजनांचा समावेश आहे. आपण सदर लेखाच्या माध्यमातून महिलांसाठीच्या विशेष 11 विविध योजनांची माहिती पाहणार आहोत.
1) लेक लाडकी योजना
महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी, मुलींचा मृत्यूदर कमी करण्यासाठी व त्यांना सशक्त, प्रबळ व आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2023 सादर करताना लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील म्हणजेच पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते वयाच्या 18 वर्षापर्यंत 1 लाख 1 हजार रु. देण्यात येतात.
योजना संपूर्ण माहिती : लेक लाडकी योजना
2) महिला उद्योगिनी योजना
महिलांना समाजात मानाच स्थान मिळावं, त्याचप्रमाणे विविध व्यवसायांमध्येसुध्दा महिला सक्षम व्हाव्यात, यासाठी शासनाकडून फक्त महिलांसाठी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकीच एक योजना म्हणजे महिला उद्योगिनी योजना होय. महाराष्ट्रातील ही एक महिला कर्ज योजना असून सदर योजनेच्या माध्यमातून लघुव्यवसायिक क्षेत्रातील व्यवसायिक, किरकोळ विक्रेते, उत्पादक किंवा स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं.
योजना संपूर्ण माहिती : महिला उद्योगिनी योजना
3) महिलांसाठी स्वर्णिमा योजना
स्वर्णिमा योजना महिला स्वयंरोजगार योजना अंतर्गत येणारी महत्त्वकांक्षी योजना असून सदरची योजना सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत मागासवर्गीय उद्योजक महिलांसाठी राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योगासाठी 2 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं. महिलांना व्यवसायासाठी नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NBCFDC) यांच्याद्वारे खूपच कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिलं जातं.
योजना संपूर्ण माहिती : महिलांसाठी स्वर्णिमा योजना
4) महिला उद्योजक धोरण योजना
पुरुषाप्रमाणेच महिलांनासुध्दा सर्व क्षेत्रांमध्ये अग्रगण्य स्थान मिळावे, यासाठी शासनाकडून महिलांसाठी कर्ज योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. महिलांसाठीच्या कर्ज योजनेपैकीच मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून देणारी योजना म्हणजे महिला उद्योजक धोरण योजना. सदरची महिला कर्ज योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या विशेष धोरणाअंतर्गत राबविण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना विविध उद्योगासाठी 20 लाखापासून 1 कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत.
योजना संपूर्ण माहिती : महिला उद्योजक धोरण
5) महिला सन्मान योजना
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये लेक लाडकी योजनेसह महिलांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे महिला सन्मान योजना होय. ST प्रवासामध्ये विशेष महिलांसाठी सवलत देणारी कोणतीही योजना उपलब्ध नसण्याची बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर, महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याची महिला सन्मान योजना सुरू करण्यात आली.
योजना संपूर्ण माहिती : महिला सन्मान योजना
6) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना
एखाद्या महिलेचा पती अकस्मात किंवा अन्यकारणामुळे मृत्यू पावल्यास, अशा महिलांना समाजात वावरताना खूप अडचणीना सामोर जाव लागत. हीच बाब लक्षात घेऊन विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी व स्वबळावर आपला आयुष्य जगण्यासाठी राज्यशासनाच्या महिला कल्याण विभागाकडून विशेष विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी विधवा महिलांना दरमहा 1,000 रु. पेन्शन राज्य शासनाकडून देण्यात येतं.
योजना संपूर्ण माहिती : विधवा पेन्शन योजना
7) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0
शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना 5,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) मुख्यत्व केंद्रशासनाची योजना असून ही योजना महिला आणि बाल विकास मंत्रालयामार्फत चालविण्यात येते. लाभार्थी गरोदर महिलांना योजनेची रक्कम तीन टप्प्यांमध्ये दिली जाते. उर्वरित 1,000 रु. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत महिलांना प्रसूतीनंतर दिले जातात. म्हणजेच एकंदरीत महिलांना सरासरी 6,000 रुपये सदर योजनेच्या माध्यमातून मिळतात.
योजना संपूर्ण माहिती : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
8) माझी कन्या भाग्यश्री योजना
मुलींचा जन्मदर प्रमाण सुधारण्यासाठी, स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 1 एप्रिल 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत, जर पालकांनी नसबंदी केली किंवा दुसरी मुलगी जन्मल्यापासून 6 महिन्याच्या आत पालकांनी नस बंदी केल्यास त्यांना 50,000 रुपयांची रक्कम शासनाकडून मुलीच्या नावावर बँक खात्यात जमा करण्यात येते.
योजना संपूर्ण माहिती : माझी कन्या भाग्यश्री योजना
9) सुकन्या समृध्दी योजना
पालकांना आपल्या मुलीसाठी असलेली चिंता दूर करण्यासाठी शासनाकडून 22 जानेवारी 2015 पासून सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली. सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारची अल्पबचत योजना असून योजनेअंतर्गत मुलीच्या पालकांना 250 रुपयापासून 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. अल्पबचत ठेवीवर लाभार्थ्यांना मुलीच्या भविष्यासाठी फायदा व्हावा म्हणून 7.6% व्याजदर दिला जातो. हा व्याजदर वर्षाच्या आर्थिक महिन्यानंतर बदलत असतो.
योजना संपूर्ण माहिती : सुकन्या समृध्दी योजना
10) जननी सुरक्षा योजना
देशातील गरीब कुटुंबातील गर्भवती महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली. जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून गरोदर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील महिलांना शासनाकडून रु. 1400 इतकी आर्थिक मदत करण्यात येते. याशिवाय गर्भवती महिलांना मदत करणाऱ्या आशा सहयोगीना प्रसूती प्रोत्साहनासाठी रु. 300 आणि प्रसूतीनंतर सेवा प्रदान करण्यासाठी रु. 300 इतकी रक्कम देण्यात येते.
योजना संपूर्ण माहिती : जननी सुरक्षा योजना
11) महिला समृद्धी कर्ज योजना
महिला समृद्धी कर्ज योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फक्त विशेषतः महिलांसाठी राबविण्यात येणारी व्यावसायिक कर्ज योजना आहे. व्यवसायिक महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी महिला समृद्धी कर्ज योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख ते 20 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं. कर्जाचा व्याजदर 4 टक्के असेल, तर परतफेडीचा कालावधी 3 वर्षाचा असेल.
योजना संपूर्ण माहिती : महिला समृद्धी कर्ज योजना
निष्कर्ष : महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहेत. आमच्यामार्फत उपयुक्त व चालू फक्त महिलांसाठी उपयोगी असलेल्या महाराष्ट्रातील 11 योजनांची माहिती सदर लेखात देण्यात आलेली आहे. शासनाकडून महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या या विविध योजनांचा महिलांना नक्कीच फायदा होईल. जर तुम्हाला इतर योजनांची माहिती हवी असल्यास, या लेखाच्या शेवटी तुमचा अभिप्राय मांडू शकता.
1) महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना कोणत्या आहेत ?
महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना शासनांकडून राबविण्यात येतात, त्याबद्दची संपूर्ण माहिती वरील लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
2) दोन मुलींसाठी महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या योजना आहेत ?
सुकन्या समृद्धी योजना व माझी कन्या भाग्यश्री योजना या दोन्ही योजना विशेषता दोन मुलींसाठी महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत.
3) फक्त महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत ?
वरील लेखातील नमूद सर्व योजना महाराष्ट्र शासनाकडून फक्त महिलांसाठी राबविण्यात येतात.
4) शासनाच्या महिलांसाठी कर्ज योजना कोणकोणत्या आहेत ?
शासनाकडून महिलांसाठी महिला उद्योजनी योजना, स्वर्णिमा योजना, महिला समृद्धी कर्ज योजना, महिला उद्योजक धोरण योजना इत्यादी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात.