मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ०५ नोव्हेंबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या “महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा- २०२२” (लिपिक-टंकलेखक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक व उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, गट-क) या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दि. ०५ डिसेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे.
