ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (मुख्य) परीक्षा – २०२० मधील संयुक्त पेपर- १ ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

मुंबई, दि. १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून  दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (मुख्य) परीक्षा – २०२० मधील संयुक्त पेपर- १ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दि. ०९ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संबंधित परीक्षेच्या सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांनी केले आहे.