गडचिरोली येथील गोंडवाना भवन येथे आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांचे हस्ते पार पडले, यावेळी मार्गदर्शन करतांना आपल्या न्याय हक्कांसाठी लढा देण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करण्याची गरज असून मोदी सरकारच्या खाजगीकरण धोरणाविरुद्ध सुद्धा आवाज उठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. किरसान यांनी केले. संमेलनाचे संयोजक देवरावजी चौवारे यांनी प्रस्तावना करून अंगणवाडी व बालवाडी सेविकांच्या समस्या विदित केल्या. यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी व मोठ्या संख्येने बालवाडी व अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस उपस्थित होत्या.
Related Articles
आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2022
महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते जेणेकरून राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा. आपल्या देशात अजूनही काही भागात जात, धर्म यावरून भेदभाव केला जातो आणि जात आणि धर्माच्या नावाखाली दंगे देखील घडवले जातात. त्यामुळे हा भेदभाव कमी करण्यासाठी व नष्ट करण्यासाठी सरकार विविध योजना सुरु करत असतात त्या योजनांपैकी […]
पीएम वाणी योजनेची राज्यातील रास्त भाव दुकानाच्या माध्यमातून अंमलबजावणी करणे बाबत
शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचा उपयोग जरी वाढलेला असला तरी त्या तुलनेने इंटरनेट सुविधा उपलब्ध होत नाही. नागरिकांसाठी आता इंटरनेटचा उपयोग करणे म्हणजे काळजी गरज बनलेले आहे. याच बाबीचे महत्त्व अधोरेखित करून शासनाच्या वतीने पीएम वाणी योजनेची सुरुवात केलेली आहे. पीएम वाणी योजना अंतर्गत नागरिकांना वाय […]
इतर राज्यांनी अनुकरण करावे असे सर्वंकष व उत्तम सांस्कृतिक धोरण तयार करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. ५: राज्याचे नवीन प्रस्तावित सांस्कृतिक धोरण सर्वंकष असेल आणि इतर राज्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचे अनुकरण करतील, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, गिरीष प्रभुणे, नामदेव कांबळे, […]