शासन निर्णय :
१.सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रु. २३५०.०० कोटी (रु. दोन हजार तिनशे पन्नास कोटी फक्त) इतकी रक्कम महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर कार्यक्रम) (२४३५ ०१८९), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
२. सदर खर्च मागणी क्रमांक व्ही-०२, २४३५- इतर कृषीविषयक कार्यक्रम ६० इतर १०१ शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना, (००) (०४) महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर) (कार्यक्रम) (२४३५०१८९), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखालील सन २०२२-२३ या वित्तीय वर्षांत उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून करण्यात यावा.
३. सदर तरतूद खर्च करण्यासाठी (V०००४) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त सहाय्यक निबंधक (अंदाज व नियोजन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच लेखाधिकारी, अधिन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले आहे. सदर निधी आहरण करुन हा खर्च वेळेत होईल याची सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दक्षता घ्यावी. तसेच या बाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी.
४. सदर शासन निर्णय, नियोजन विभाग अनौपचारीक संदर्भ क्रमांक ३०६/१४३१ दिनांक ०२.०९.२०२२ अन्वये तसेच वित्त विभाग अनौपचारीक संदर्भ क्रमांक ४५२/ २०२२ /व्यय- २ दिनांक १६.०९.२०२२ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२२०९१६१७३६१२१७०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.
प्रस्तावना :
सन २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देणेबाबत दिनांक २७.०७.२०२२ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुसार सहकार विभागाच्या संदर्भ क्र. १ दिनांक २९.०७.२०२२ च्या शासन निर्णयान्वये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तसेच, सदर योजनेसाठी सहकार विभागाच्या संदर्भाधीन क्र. २ दि.०२.०८. २०२२ च्या शासन निर्णयान्वये नवीन लेखाशिर्ष निर्माण करण्यात आले आहे.
सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात रु. ४७००.०० कोटी इतकी रक्कम वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक ३ दिनांक २९.०८.२०२२ च्या परिपत्रकान्वये तसेच सहकार विभागाच्या संदर्भ क्रमांक ४ दिनांक ३०.०८.२०२२ च्या शासन निर्णयान्वये पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आली आहे. त्याअनुसार याबाबत सहकार आयुक्त कार्यालयाच्या संदर्भाधीन दिनांक ०१.०८.२०२२ च्या पत्राद्वारे प्राप्त प्रस्तावानुसार निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.