पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता, त्यानुसार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण (MJPSKY KYC) झालेल्या 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरीत करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या 33 हजार 356 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण (MJPSKY Protsahanpar Anudan KYC) झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही. अशा पात्र शेतकऱ्यांची eKYC प्रलंबित लाभार्थी (MJPSKY eKYC Pending List) यादी जाहीर केली आहे.
शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण (MJPSKY KYC) करुन घ्यावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. संबंधित बॅंकांनीही खातेदारांना याबाबत कळवावे, असे निर्देशही सहकार विभागाने दिले आहेत.
शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर ५०,०००/ लाभ योजना eKYC प्रलंबित लाभार्थी यादी जाहीर ! MJPSKY eKYC Pending List:
आपण इथे फक्त रत्नागिरी जिल्ह्याची eKYC प्रलंबित लाभार्थी यादी उपलब्ध करून देणार आहोत, बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या CSC सेंटर/आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँकेच्या शाखेत भेट देऊन यादी मध्ये नाव आहे का ते तपासा आणि आधार प्रमाणीकरण करून घ्या.