म.रा.वि.मं. सुत्रधारी कंपनी व महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता शिष्यवृत्ती, रोख पारितोषिक, मार्च / एप्रिल २०२२ या शैक्षणिक वर्षात माध्यमिक शालांत (इयत्ता १०) व उच्च माध्यमिक शालांत (इयत्ता १२ वी) परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या तसेच सलग कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात.
महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023:
पात्रता:
1) मार्च / एप्रिल २०२२ या शैक्षणिक वर्षात माध्यमिक शालांत ( इयत्ता १० ) व उच्च माध्यमिक शालांत ( इयत्ता १२ वी ) परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना ऑनलाईन शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
2) माध्यमिक ( इ. १० ) व उच्च शालांत ( इ. १२ वी ) प्रमाणपत्र परीक्षा यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी ६५ टक्के व राखीव प्रवर्गासाठी कमीत कमी ६० टक्के तसेच सलग शिष्यवृत्तीसाठी खुला वर्ग ५०% व राखीव प्रवर्गासाठी ४५% गुण मिळवलेल्या पाल्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकतात.
आवश्यक कागदपत्रे:
- अर्जासोबत चालू वर्षाची गुणपत्रिका,
- जात प्रमाणपत्र ( राखीव प्रवर्गासाठी ).
- जात पडताळणी प्रमाणपत्र ( अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाकरीता ).
- पुढील वर्गात प्रवेश घेतल्याबाबत प्रवेश फी पावतीची किंवा बोनाफाईड प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडणे / Online Upload करणे बंधनकारक आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: ३० नोव्हेंबर २०२२
महावितरण शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करा:
महावितरण शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महावितरणच्या खालील Employee Portal वर भेट देऊन, कर्मचाऱ्यांनी आपल्या पाल्याचे ( अर्ज ) Employee Portal अंतर्गत Application > Ward Scholarship Application येथे क्लिक करून शिष्यवृत्तीचा अर्ज भरावयाचा आहे. नमूद केलेली कागदपत्रे Upload करुन पाल्यांचा अर्ज Submit करावयाचा आहे.
https://empportal.mahadiscom.in/EmpPortal
टीप: अर्ज Save करून Submit न केलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही यांची कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी.
महावितरण शिष्यवृत्ती परिपत्रक: महावितरण शिष्यवृत्ती परिपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.