ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र योजना माहिती विदर्भ

महिला किसान योजना असा लाभ

पीएम किसान व सीएम किसान या संदर्भातील माहिती तर तुम्हाला असेलच परंतु महिला किसान योजना mahila kisan yojana संदर्भात जर तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या या योजनेचा लाभ कसा दिला जातो.

महिला किसान योजना अंतर्गत अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो ज्या अनुसूचित जाती समाजातील आहेत. अनुसूचित जातीमधील ज्या उपजाती आहेत जसे की चर्मकार, ढोर, होलार मोची इत्यादी प्रवर्गातील महिलांना या योजनाचा लाभ दिला जातो.

Mahila kisan yojana अंतर्गत वरील समाजाच्या महिलांचे जीवनमान उंचावे तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांना मनाचे स्थान मिळावे हा या महिला किसान योजनेचा उद्देश आहे.

केवळ अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील महिलाच या महिला किसान योजनेसाठी पात्र असणार आहे.

महिला किसान योजनेचा अटी Mahila kisan yojana

या योजनेच्या अटी खालीलप्रमाणे आहेत.

  1. जी व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करणार आहे ती चर्मकार समाजातीलच असावी.
  2. अर्जदार व्यक्ती महाराष्ट्रील रहिवासी असावी.
  3. जी व्यक्ती अर्ज सादर करणार आहे तिचे वय १८ ते ५० वर्षापर्यंत असावे.
  4. अर्जदार व्यक्ती जो व्यवसाय करणार असेल त्या व्यवसायाचे त्या व्यक्तीस पूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे.
  5. ग्रामीण भागासाठी ९८००० व शहरी भागासाठी १२०००० एवढे उत्पन्न असणे गरजेचे.
  6. तहसीलदार किंवा त्या समान सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला.
  7. अर्जदाराने यापूर्वी मंडळाच्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा.

वरील प्रमाणे या योजनेच्या अटी आहेत या अटींचे तुम्ही पालन करीत असाल तरच या योजनांचा लाभ मिळणार आहे.

महिला किसान योजनेचे स्वरूप.

महिला किसान योजनांतर्गत महिलांना ५० हजार आर्थिक सहाय्यता दिली जाते. यामध्ये १० हजार रुपये अनुदान तर ४० हजार रुपये ५ टक्के व्याजदराने दिले जाते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेच्या नावावर शेती असणे गरजेचे आहे. शेती पतीच्या नावावर असेल किंवा दोघांच्या नावावर असेल अशा वेळी देखील या योजनांचा लाभ मिळू शकतो.

पतीच्या नावे शेतजमीन असेल तर पतीचे प्रतिज्ञापत्र घ्यावे लागते.

महिला किसान योजनांतर्गत दिले जाणारे कर्ज हे फक्त शेती व्यवसायासाठीच दिले जाते.

शेती व्यवसाय करण्यासाठी पैशांची गरज भासते अशावेळी महिला किसान योजनेचा लाभ घेतल्यास अशा महिलांना शेती करण्यासाठी आर्थिक सहाय्यता मिळू शकते. ज्यातून चांगल्या प्रकारे शेती केली जावू शकते.

कोठे कराल अर्ज.

सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेसाठी अर्ज कोठे करावा लागतो या बद्दलची माहिती होय. महिला किसान योजना mahila kisan yojana अर्ज संबधित जिल्ह्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कार्यालयामध्ये निशुल्क मिळतो.

अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्जामध्ये व्यवस्थित माहिती भरून हा अर्ज संबधित कागदपत्रासह जिल्ह्याच्या कार्यलयात सादर करावा.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अधिकृत वेबसाईट लिंक

या योजना संदर्भातील काही प्रश्न आणि उत्तरे खालीलप्रमाणे आहेत.

आर्थिक मदत किती मिळते?

Mahila kisan yojana अंतर्गत अर्जदारास ५० हजार रुपये आर्थिक मदत मिळते. हि आर्थिक मदत केवळ शेतीसाठीच मिळते.

योजना केंद्राची आहे कि राज्य शासनाची?

केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ अंतर्गत हि योजना राबविली जाते.

योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

अनुसूचित जाती मधील चर्मकार प्रवर्गातील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज कोठे करावा?

जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालय येथे अर्ज करावा.

अर्ज ऑनलाईन आहे कि ऑफलाईन?

अर्ज ऑफलाईन आहे. अर्जाचा नमुना समाज कल्याण कार्यालयात मिळतो.