गडचिरोली महाराष्ट्र राज्य

माजी राज्यमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराजांनी देवनगर येथील हृदय रोग पीडित गौतम बिश्वास यांना केले आर्थिक मदत

मुलचेरा:-
तालुक्यातील देवनगर येथील गौतम बिश्वास मागील बरेच दिवसापासून हृदय रोगापासून ग्रस्त होते.घरची परिस्थिती बिकट असल्याने उपचारासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता.
देवनगर येथील भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी सदर माहिती माजी राज्यमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराजांच्या दरबारी पोहचवले दानशूर राजा यांनी आर्थिक मदत दिली.
माजी राज्यमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे प्रतिनिधी म्हणून भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सुंदरनगर उपसरपंच संजित सरकार,भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष किशोर मल्लिक यांच्या हस्ते गौतम बिश्वास यांना आर्थिक मदत देण्यात आले तसेच पुढील अडचणीस मदत करू अशे आश्वासन दिले.
या प्रसंगी विवेकानंदपुर ग्रामपंचायत उपसरपंच तपन मल्लिक तथा समीर बैरागी,भाजप कार्यकर्ते गावातील नागरिक उपस्थित होते.