ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

क्रीडा क्षेत्रात गुणवत्ता सिद्ध करून आपली प्रगती करा :-माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

लगाम येथे भव्य टेनिस बॉल (30 सर्कल) रात्रकालीन क्रिकेट सामन्याचा उद्घाटन संपन्न

मूलचेरा :- तालुक्यातील लगाम येथे ‘जय सेवा 750 क्रिकेट क्लब लगाम’ यांच्या सौजन्याने बाजारवाडी पटांगणात भव्य टेनिस बॉल (30 सर्कल) रात्री कालीन क्रिकेट सामन्याच उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी स्पर्धकांना संबोधित करतांना राजे साहेब म्हणाले आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील युवक क्रिकेट, फूटबॉल, कब्बडी, व्हॉलीबॉल, असे अनेक खेळ मोठ्या उत्साहात खेळतात.आपल्या क्षेत्रातील युवकांमध्ये क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत भरपूर गुणवत्ता आहे,त्यामुळे युवकांनी क्रीडा क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करत,आपली प्रगती क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून करावी आणि आपल्या क्षेत्राचं नावलौकिक करावे असे मत यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केलं.

भव्य टेनिस बॉल (30 सर्कल) रात्रकालीन क्रिकेट सामन्याचा प्रथम पारितोषिक 20001/- रु माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पारितोषिक 15001/-रु माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्या कडून देण्यात आले.मोठ्या संख्येने यावेळी क्रिकेट संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते अवधेशरावबाबा आत्राम,तर अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे,सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ उरेते,पोलिस पाटील गिरमाजी मडावी,अमित गोविंदवार,प्रमोद चांदावार,राजू सोनटक्के,संतोष मोहूर्ले,महादेव सिडाम तसेच युवा वर्ग, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.