ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

ओडिगुडम येथील मल्ला विस्तारी टेकुलवार या अर्धांगवायू (लकवा) ग्रस्त रुग्णाला मिळाला आधार!

माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे आर्थिक मदत..!

गडचिरोली जिल्ह्याचे विकास पुरुष आणि दानशूर राजे म्हणून सुपरिचित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या क्षेत्रातील जनतेला नेहमीच मदतीचा हात देत असतात आणि आपल्या मतदार संघातील गरीब व रोगाने ग्रासलेल्या आणि अडचणीत असलेल्या जनतेला नेहमीच आर्थिक मदत करीत असतात,

त्यांनी आज सुध्दा अहेरी तालुक्यातील बोरी क्षेत्रातील ओडिगुडम येथील रहिवासी असलेले श्री.मल्ला विस्तारी टेकुलवार हे अनेक दिवसांपासून अर्धांगवायू (लकवा) या रोगाने ग्रस्त आहेत आणि उपचार करण्यासाठी आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने त्यांच्या कुटूंबात आर्थिक समस्या निर्माण झाली होती,पण ही
टेकुलवार कुटुंबाची ही आर्थिक समस्या राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या पर्यंत कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिली.
त्यावेळी राजे साहेबांनी टेकुलवार कुटूंबाला 10000(दहा हजार) रुपये कार्यकर्त्यांच्या हस्ते पाठवुन आर्थिक मदत केली

यावेळी बोरी येथील भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते विक्की पुल्लीवार,लक्ष्मण पानेमवार व टेकुलवार कुटुंबातील सदस्य,ओडिगुडम येथील गावकरी उपस्थित होते.