ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पुण्यात ‘या’ तारखेला होणार मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा

मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याला लवकरच सुरुवात होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मनोज जरांगे मराठा समाजाच्या गाठी-भेटी दौरे सुरु करणार आहेत. सध्या पुण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेची तयारी सुरु आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मराठा समाजाच्या गाठी-भेटी दौरे सुरु करणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान जरांगे पाटील, रविवारी 19 नोव्हेंबरला पुण्याच्या भोर तालुक्यातील मराठा समाजाची भेट घेणार आहेत. भोर मधील शेटे मैदानावर संध्याकाळी 4 वाजता जरांगे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी रायगड किल्ल्याचं दर्शन घेऊन जरांगे पाटील, वरंधघाट मार्गे भोरला येणार आहेत. भोरमध्ये 4 वाजता सभा घेऊन जरांगे पुण्यातील आळंदी येथे मुक्कामी जाणार आहेत. भोर तालुक्यात मनोज जरांगे यांच्या सभेच्या नियोजनासाठी मराठा समन्वयकांच्या बैठका, जास्तीतं जास्त लोकांनी सभेला यावं, यासाठी मराठा समाजाला आवाहन करण्यात आलय.

जरांगे यांच्या स्वागताची सकल मराठा समाजाकडून जोरदार तयारी सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा मराठा समाज गाठी भेटी दौरा 15 नोव्हेंबर पासून सुरु होतोय. 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यामध्ये जरांगे पाटील, रविवारी 19 नोव्हेंबरला पुण्याच्या भोर तालुक्यातील मराठा समाजाची भेट घेणार आहेत. भोरमध्ये संध्याकाळी 4 वाजता सभा घेऊन जरांगे पुढे पुण्यातील श्री क्षेत्र आळंदी येथे मुक्कामी असतील. भोर तालुक्यात मनोज जरांगे यांच्या सभेच्या नियोजनासाठी मराठा समन्वयकांकडून गावागावामध्ये बैठका घेण्यातं येतायत, जास्तीतं जास्त मराठा बांधवांनी सभेला यावं, असं आवाहन मराठा समाजातर्फे करण्यात आलयं.

सरकारकडून वेगवान हालचाली

जरांगे यांच्या स्वागताची सकल मराठा समाजाकडून जोरदार तयारी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक आहेत. कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्याव, ही त्यांची मागणी होती. त्यानुसार राज्य सरकारने पावल उचलली आहेत. राज्यात सर्वत्र अभ्यासकाकडून शोध मोहिम सुरु आहे. कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. 24 डिसेंबरपर्यंत सर्व मराठ्यांना आरक्षण द्याव ही जरांगे पाटील यांची मागणी आहे. दरम्यान कुणबीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोध आहे.