शासनामार्फत महिलांसाठी विविध अशा योजना किंवा अभियान वेळोवेळी राबविल्या जातात. चालू असलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त राज्याच्या सार्वजनिक विभागामार्फत ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित “ अश्या प्रकारच अभियान सुरू करण्यात आलेला आहे. या लेखामध्ये आपण अभियानाचा मुख्य उद्देश, कालावधी, अभियानापासून होणारे फायदे यासंदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान
कोणत्याही कुटुंबातील महिलांवरती मोठ्या प्रमाणावर कौटुंबिक जबाबदारी असते. कारण महिलाही कुटुंबातील कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना बहुतांश महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेता शासनामार्फत आता mata surkshit tar ghar surkshit अशा प्रकारचा एक महत्त्वकांक्षी निर्णय महिलांसाठी घेण्यात आलेला आहे.
अभियान पात्रता व कालावधी
राज्यातील ग्रामीण शहरी आदिवासी क्षेत्रासह संपूर्ण राज्यातील महिला, गरोदर माता, यांची विविध अशी आरोग्य तपासणी, चाचणी मोफत करण्यासाठी सार्वजनिक विभागामार्फत माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान सुरू करण्यात आलेला आहे. आरोग्य तपासणी किंवा चाचणीसाठी महिलांची किमान वय 18 वर्ष असणे आवश्यक आहे. अभियान सामान्यता 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या दरम्यान संपूर्ण राज्यभरामध्ये राबविला जणार आहे.
व्याप्ती व समाविष्ट व्यक्तींचा सहभाग
अभियान जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये राबविले जाणार असून त्यामध्ये खेड्यातील दवाखाना, सिव्हिल सर्जन, खाजगी व शासकीय शाळा, कॉलेजेस, ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी, कृषी विभाग, तहसीलदार, आशा कार्यकर्त्या इत्यादी सर्व विभागातील शासकीय व्यक्तींना हा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत.
मोफत आरोग्य तपासणी
अभियानाच्या माध्यमातून महिलांना होणारा फायदा म्हणजे ? हा अभियान सर्व स्तरावर राबविला जात असल्याकारणाने गाव पातळीवरसुद्धा महिलांना त्यांच्या आरोग्यविषयी मोफत चाचण्या करता येतील. सर्व आरोग्य अधिकारी व यंत्रणेसह हा अभियान पार पाडला जात असल्यामुळे योग्य त्या चाचण्या व उपचार वेळीच करण्यात येतील.
अभियानाचा मुख्य उद्देश
कुटुंबातील स्त्री म्हणजेच ती आई असेल, आजी असेल, पत्नी असेल किंवा इतर एखादी महिला असेल. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना अशा व्यक्ती किंवा महिला स्वतःला पूर्णता कामांमध्ये झोकून देऊन कुटुंबाची सेवा करत असतात.
अश्यावेळी सहाजिकच त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतो. या अभियाना अंतर्गत घरा-घरातील माता निरोगी, सदृढ, जागरूक राहावी व समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी असा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे राज्यातील सर्व माता, भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्यक मोफत तपासणी करून घ्यावी, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत करण्यात आली आहे.