काँग्रेसची विचारधारा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा-जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे आवाहन
मुलचेरा- काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सर्व सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना विकासाचा केंद्र बिंदू मानत वाटचालीची व समाजात सद्भावना कायम ठेवण्याची आहे. मात्र सध्याचे सत्ताधारी जाती-धर्मात तेड निर्माण करीत सत्ता उपभोगत आहेत. सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याची बेरोजगारांची समस्या मार्गी लागण्यासाठी काँग्रेसची विचारधारा जिवंत असणे गरजेचे आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही विचारधारा समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे. असे आव्हान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले.
तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर भारत जोडो यात्रे नंतर आंदोलनाचा दुसरा टप्पा ‘हात से हात जोडो’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या नियोजनाकरिता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सोमवारला काँग्रेस कार्यकर्ता सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी निरीक्षक डॉ.नामदेवराव किरसान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे आदिवासी प्रदेश अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा मुलचेरा तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष रवीभाऊ शाह, किसान काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष वामनराव सावसागडे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे,बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष बीजन सरदार, पंचायत समिती मुलचेराचे माजी सभापती तथा महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष सौ.सुवर्णा येमुलवार, मुलचेरा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद गोटेवार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शुभम शेंडे, मुलचेरा काँग्रेसचे प्रभारी निरीक्षक रवींद्र पाल, अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष रमेशजी कोडापे, परिवहन विभागाचे प्रमुख रुपेश टिकले, राहुल चौधरी, गणेश तलांडे, किशोर येलमुले व मुलचेरा तालुका काँग्रेसचे नवनियुक्त पदाधिकारी तथा काँग्रेस कार्यकर्ते महिला काँग्रेस व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.