ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

MH-SET सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) तारीख जाहीर २०२३ मध्ये होणार परीक्षा

महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत व यु.जी.सी., नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी आयोजित सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली अडतिसावी (३८ वी) सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार, दि. २६ मार्च, २०२३ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदरहू परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगांव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी व पणजी (गोवा) या केंद्रांवर घेण्यात येईल विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच भरावयाचा आहे. संकेतस्थळावर अर्ज दि. १० नोव्हेंबर, २०२२ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. ३० नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत उपलब्ध असेल. ५०० रू. विलंब शुल्कासहीत अर्ज भरण्याचा कालावधी दि. ०१ डिसेंबर, २०२२ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. ०७ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत असेल.

परीक्षा शुल्क : १. खुला – रु. ८००/- (प्रक्रिया शुल्कासह)

२. इतर मागासवर्गीय / भटक्या व विमुक्त जाती जमाती/विशेष मागासवर्गीय (फक्त उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी) – रू. ६५०/- (प्रक्रिया शुल्कासह)

(For Non-Creamy Layer) खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि विकलांग प्रवर्ग (PwD) / अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / तृतीयपंथी / अनाथ.

सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर साधारणतः डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडयात प्रसिध्द करण्यात येईल. परीक्षा शुल्क भरून सुध्दा ज्या विद्यार्थ्यांचे नाव सदर यादीत समाविष्ट नसेल अशा विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केल्याचा पुरावा [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवावा.

सेट परीक्षेचे माहितीपत्रक व अभ्यासक्रम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.