ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

Minister of Maharashtra : येत्या नवरात्रीत होणार रखडलेल्या मंत्रिमंडळाची स्थापना? कोणत्या पक्षाला किती मिळणार मंत्रिपदं

महाराष्ट्रातील राजकारण सध्या देशात चर्चेचा विषय बनला आहे. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. पुरेसे संख्याबळ असतानाही अजित पवार गटाला भाजपाने गळाला लावत सत्तेत सहभागी करून घेतले. परंतू ज्या राष्ट्रवादीचे कारण देत शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या सेनेसोबत फारकत घेऊन भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्याच सोबत मांडीला मांडी लाऊन बसण्याची वेळ अजित पवार यांच्यावर आली. अशातच पुन्हा अजित पवार गट सत्तेत आल्यावर मंत्री पदाच्या खातेवाटपातही दुजाभाव झाल्याचे शिंदे गटाचे आमदार वेळोवेळी बोलून दाखवतात.

अशातच गेल्या आठवड्यात शिंदे- फडणवीस- पवार सरकारने 4 ऑक्टोबरला त्यांच्या नवीन मंत्रिमंडळातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या मंत्रिमंडळ वाटपात राष्टवादीच्या अजित पवार गटाला सर्वात जास्त पदे देण्यात आली आहेत. तसेच संपूर्ण महाराष्टाच लक्ष लागलेल्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा ठसा पुन्हा उमटवला आहे.

तर पालकमंत्री पदाचा तिढा सुटला खरा पण आता महाराष्ट्रात पुन्हा शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अशातच आता राज्यातील जनतेचं शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. अशातच सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील सरकारचा कित्येक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार घटस्थापनेच्या मुहूर्तावर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

या नाट्यमय घडामोडीत सर्वात मोठा हात हा भाजप पक्षाचा असल्याने भाजपाला 8 मंत्रीपदे मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर शिवसेना (शिंदे गट ) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला इतर 6 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळण्याची शक्यता आहे.