ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी राज्यमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराजांनी कोपरल्ली येथील कॅन्सर पीडित महिलेला केली आर्थिक मदत

दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत
मूलचेरा:-
तालुक्यातील स्थानिक कोपरल्ली येतील रहवासी असलेल्या लिलाबाई गजानन नैताम ही महिला गेल्या एका वर्षांपासून कॅन्सर सारख्या गंभीर रोगाने त्रस्त होती आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने खूप मोठी अडचण या परिवारावर आली होती.पण ही बाब राजे अमरीशराव महाराज माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना लक्षात येताच त्यांनी लिलाबाई गजानन नैताम या महिलेला 10000 रुपयाची आर्थिक मदत केली आणि त्यांना सर्वतोपरी पुन्हा मदत करण्याच आश्वासन सुध्दा दिल.विशेष बाब म्हणजे अहेरी इस्टेट चे दानशूर राजे अमरीशराव महाराज हे अनेकदा आपल्या दानवीर स्वभावाने आपल्या क्षेत्रातील लोकांना अडीअडचणीत,रोगाने ग्रासलेल्या, तसेच संकटात सर्वोपरी मदत करीत असतात आणि त्यांनी आतापर्यंत अनेक कॅन्सर पीडित लोकांना आर्थिक मदत केली आहे,आज कोपरल्ली येथे सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ उरेते,नगरसेवक दिलीप आत्राम, गणेश गारघाटे,शंकर मंडल, प्रभाकर खोबरे, राजूरकर सर,वाढई सर,बालाजी बरलावार, खोबरे काकू, गजानन नैताम यांचे कुटुंबातील सदस्य आणि कोपरल्ली येथील गावकरी उपस्थित होते.