मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील लिपिक, लिपिक-टंकलेखक व टंकलेखक संवर्गातील कर्मचा-यांना सहायक कक्ष अधिकारी पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक १० डिसेंबर, २०२२ रोजी सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२२ फक्त मुंबई येथे आयोजित करण्यात येईल.
अर्ज करण्याचा कालावधी | 30.09.2022 ते 20.10.2022 |
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेणे याकरीता विहित अंतिम दिनांक | 27.10.2022 |
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक |
22.10.2022 |
एकूण जागा | 66 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
परीक्षा योजना :
- परीक्षेचे टप्पे :- एक लेखी परीक्षा –
- परीक्षेचे स्वरुप :- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
- प्रश्नपत्रिका :- दोन
- एकूण गुण :- २००
- परीक्षा केंद्र – मुंबई, केंद्र संकेतांक ३०
पात्रता :
फक्त मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या खुद आस्थापनेवरील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कार्यरत लिपिक, लिपिक टंकलेखक व टंकलेखक संवर्गातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अधिपत्याखालील कोणत्याही दुष्यम कार्यालयातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेकरीता अर्ज करण्यास पात्र नाहीत.
अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी
अर्ज येथे करा | |
अधिकृत जाहिरात | |
अधिकृत वेबसाईट |