ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

देशात 32 कोटींहून अधिक गॅस कनेक्शन

केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची माहिती
– 2014 मध्ये 14 कोटी कनेक्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून देशात महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. यापैकी एक म्हणजे उज्ज्वला योजना आहे. 2014 मध्ये देशात केवळ 14 कोटी एलपीजी गॅस सिलेंडर होते. त्यावेळी गॅस कनेक्शन घेण्यासाठी अनेक लोकांच्या शिफारशी घ्याव्या लागत होत्या. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये उज्ज्वला योजना सुरू केली, त्यानंतर महिलांना सहज गॅस कनेक्शन मिळत आहे. आज देशात 32 कोटींहून अधिक गॅस कनेक्शन असल्याची माहिती केेंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री आणि गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रीUnion Minister Hardeep Singh Puri  हरदीपसिंग पुरी यांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात बांधण्यात आलेल्या 4 कोटी घरांपैकी सर्वाधिक घरे महिलांच्या मालकीची आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे देशातील विधानसभा आणि संसदेत महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या वैशिष्ट्यांची माहितीही यावेळीUnion Minister Hardeep Singh Puri  हरदीपसिंग पुरी यांनी दिली.
नागरिकांच्या घरोघरी जाऊन सुविधा
जुन्या काळात, जेव्हा नागरिकांना सरकारी सुविधांचा लाभ घ्यावा लागत असे, तेव्हा त्यांना सरकारी कार्यालयात जावे लागायचे आणि अधिकार्‍यांना सांगावे लागत होते. मात्र, विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आता शासकीय अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन सुविधा देत आहेत. समाजातील मागासलेल्या आणि वंचित घटकांतील महिलांनाही उज्ज्वला योजनेसारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ घेता येतो. प्रधानमंत्री स्वनिधी योजनादेखील मैलाचा दगड ठरत असल्याचे यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.