शासनामार्फत नागरिकांसाठी सतत निरोगी आरोग्य, शारीरिक उपचार, शस्त्रक्रिया इत्यादीसाठी विविध योजना राबविल्या जातात. ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे. आज आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी बद्दलची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीअंतर्गत नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया इत्यादीसाठी रुग्णाच्या आजारानुसार ३ लाखापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता फंडामधून आर्थिक मदत केली जाते. पूर्वीची मर्यादा 50 हजारावरून वाढवून आता तीन लाखापर्यंत करण्यात आली असून, यामध्ये विविध नवीन आजारांचा, शस्त्रक्रियेचा समावेश करण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना मदतीसाठी आर्थिक रक्कम दिली जाते. गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. इच्छुक लाभार्थी रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
योजना संपूर्ण नाव | मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी |
लाभार्थी वर्ग | राज्यातील नागरिक |
लाभ रक्कम | सहायता वर्गवारीनुसार |
सहायता निधीचे प्रमुख | मुख्यमंत्री |
अर्जाची प्रक्रिया | ऑफलाईन / ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा
|
मुख्यमंत्री सहायता निधी Documents
- विहित नमुन्यातील अर्ज
- वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक/प्रमाणपत्र मूळ प्रत डॉक्टरांच्या सही शिक्यासह
- अंदाजपत्रक खाजगी रुग्णालयाचे असल्यास सिव्हिल सर्जन यांच्याकडून प्रमाणित करणे आवश्यक
- तहसील कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला ( १ लाख ६० हजार )
- रुग्णाचा आधारकार्ड
- रुग्णाचा राशनकार्ड
- हॉस्पिटल बँक डिटेल्स
- अपघात झाल्यास MLC/FIR कॉपी
- संबंधित आजाराचे रिपोर्टस्
मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये विविध रोगांचा समावेश
१) कॉकलियर इम्प्लांट २) हृदय प्रत्यारोपण ३) यकृत प्रत्यारोपण ४) किडनी प्रत्यारोपण ५) फुफ्फुस प्रत्यारोपण ६) बोन मॅरो प्रत्यारोपण ७) हाताचे प्रत्यारोपण ८) हिप रिप्लेसमेंट ९) कर्करोग शस्त्रक्रिया १०) अपघात शस्त्रक्रिया ११) लहान बालकांचे शस्त्रक्रिया १२) मेंदूचे आजार १३) हृदय रोग १४) डायलिसिस १५) कर्करोग – किमोथेरपी/रेडिएशन १६) अपघात १७) नवजात शिशुचे आजार १८) गुडघ्याचे प्रत्यारोपण १९) बर्न रुग्ण २०) विद्युत अपघात रुग्ण इत्यादी विविध गंभिर आजारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून नागरिकांना मदत केली जाते.
अर्ज कसा करावा ?
लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीचा अवलंब करता येतो. बऱ्याच वेळी असे लक्षात आले आहे की, ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या गोष्टीचा विचार करून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयातसुद्धा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी Contact & Email
गरजू व इच्छुक नागरिक मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ घेण्यासाठी पुढील पत्यावर संपर्क करू शकतात. मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, जीवनदायी भवन, दुसरा मजला, राज्य कामगार विमा योजना रूग्णालय आवार, गणपतराव जाधव मार्ग, वरळी नाका, वरळी मुंबई – ४०००१८, संपर्क क्रमांक : ०२२-२४९९९२०३/०४/०५ ई-मेल [email protected]
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी काय आहे ?
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी नागरिकांसाठीची मदत प्रणाली असून याअंतर्गत विविध संकटांसाठी नागरिकांना निधी दिला जातो.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून किती मदत देण्यात येते ?
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वैद्यकीय उपचारासाठी तीन लाखापर्यंत मदत देण्यात येते.
मुख्यमंत्री वैद्यकीय निधीसाठी कुठे अर्ज करावा ?
अर्ज करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा पत्ता वरील लेखामध्ये देण्यात आलेला आहे.