गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मुलचेरा बेमुदत संप

मुलचेरा :-

        जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांनी १४ मार्च पासून बेमुदत संप सुरू केला असून यामुळे आज सरकारी कार्यालयात मोठी अडचण निर्माण झाली आहे. मुलचेरा तालुक्यातील  कर्मचारी हे या संपात सहभागी झाले आहे. आज सकाळी तालुक्यातील कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या वतीने एकच मिशन जुनी पेन्शन च्या घोषणा देत तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. राज्य सरकारने कुठलीही कारवाई केली तरी आम्ही मागे हटणार नाही, भले आंदोलनाला बरेच दिवस लागले तरी चालेल कुठल्याही परिस्थितीत जुनी पेन्शन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा गंभीर इशारा यावेळी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

शाळा, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महाविध्यालय, तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती अंतर्गत असलेल्या विविध विभागात पूर्णपणे शुकशुकाट दिसून येत असल्याने कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागातील कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने रुग्णांचे हाल होताना दिसून येत आहे.

आज सकाळपासूनच विविध विभागातील कर्मचारी पंचायत समिती तहसील कार्यालय तसेच ग्रामीण रुग्णालय समोर बसून घोषणा देत शासनाच्या प्रति रोष व्यक्त करत आहेत.