ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुलचेरा येथे वीर बाबुराव शहीद दिन साजरा

 मुलचेरा :-शहीद वीर बाबुराव यांचे शहीद दिनी स्थानिक वीर बाबुराव शेडमाके सास्कृतिक भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विकास नैताम हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन नायब तहसीलदार तलांडे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपनगराध्यक्ष मधुकर वेलादी, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे विभागीय उपाध्यक्ष वासुदेव मडावी,पारंपरिक इलाखा ग्रामसभा चौडमपली चे अध्यक्ष कालिदास कुसनाके , प्रमुख मार्गदर्शक महेश मडावी,गजानन नैताम ,तालुका ग्रामसभा अध्यक्ष तथा नगरसेवक दिलीप आत्राम, स्विकृत नगरसेवक तथा प्राचार्य लतीफ शेख ,नगरसेवक काशिनाथ कन्नाके ,नगरसेविका सुनिता कुसनाके,प्रा प्रवीण कुमरे, नगरसेविका मनीषा गेडाम, नगर सेविका सुनिता कोकेरवार, प्रमुख मार्गदर्शक अश्विन मडावी , नगरसेवक बंडू आलाम .पोलीस पाटील उषा पेंदाम ,नगरसेवक विजय कुळमेथे , नगरसेविका सपना मडावी,नगरसेविका मंगला आलाम आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी वीर बाबुराव चौकात राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके,राणी दुर्गावती,क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या संयुक्त तैल चित्राचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच मुलचेरा शहरातील दुर्गावती नगर, बिरसा मुंडा चौक ,कुमराम भीमू चौक. गोंडवाना चौक  मार्गे नेताजी सुभाष चंद्र चौकापर्यंत काढलेल्या रॅलीत शेकडो नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते .गोंडी संस्कृती दर्शन नृत्य घेण्यात आले व सहभागी चमूना बक्षीस देऊन गौरविण्यात आले त्याचप्रमाणे जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथील प्रदर्शनात सहभागी झालेल्या वृषाली उईके या विद्यार्थिनीचा या वेळी सत्कारही करण्यात आला . या कार्यक्रमाचे संचालन रवी रवींद्र मडावी व ताराचंद परचाके यांनी केले प्रस्ताविक वासुदेव मडवी यांनी तर आभार रमेश कुसनाके यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता सांताराम मडावी, बुधाजी पल्लो . काशिनाथ आर्के,दिगंबर गावडे. किसन आलाम , गणपत मडावी, ताराचंद परचाके ,पवन आत्राम , दिनेश पेंदाम ,सुरज सिडाम, अंबादास आत्राम ,अनिल मडावी, संतोष आत्राम ,ऑल इंडिया आदिवासी एम्लॉईज फेडरेशन , ग्रामसभा तसेच वीर बाबुराव स्मारक समितीच्या पदाधिकारी ,युवक युवतींचे फार मोठे सहकार्य लाभले.