ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2022

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते जेणेकरून राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा. आपल्या देशात अजूनही काही भागात जात, धर्म यावरून भेदभाव केला जातो आणि जात आणि धर्माच्या नावाखाली दंगे देखील घडवले जातात. त्यामुळे हा भेदभाव कमी करण्यासाठी व नष्ट करण्यासाठी सरकार विविध योजना सुरु करत असतात त्या योजनांपैकी एक योजना म्हणजे Inter Caste Marriage Scheme Maharashtra

समाजातील अस्पृश्यता निवारण करण्यासाठी व आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच समाजातील जात,धर्म भेदभाव नष्ट करण्यासाठी Inter Caste Marriage Scheme सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५००००/- रुपयांची रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात येते.

आंतरजातीय विवाह योजनेची सुरुवात महाराष्ट्रात होणाऱ्या जाती आणि धर्म भेदभाव नष्ट करण्यासाठी सुरु करण्यात आली जेणेकरून जात आणि धर्माच्या नावाखाली भेदभाव न होवो.आपल्या देशात विविध राज्यात अजून सुद्धा जाती धर्मावरून दंगे होतात तथापि आंतरजातीय विवाहाबद्दल अजून सुद्धा खूप साऱ्या चुकीच्या समजुती सामाजात लोकांच्या मनात आहेत या सर्व चुकीच्या समजुतींना नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने Inter Cast Marriage Scheme Maharashtra ची सुरुवात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला या योजनेनंतर्गत जे जोडपे आंतरजातीय विवाह करेल त्यांना या योजनेअंतर्गत ५००००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य करण्यात येते
आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी एक जण म्हणजेच मुलगा किंवा मुलगी अनुसूचीत जाती प्रवर्गातील व दलित समाजातील असल्यास अशा जोडप्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या माध्यमातून २.५ लाख रुपये प्रोत्साहन स्वरूपात देण्यात येते.

योजनेचे नाव आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र
विभाग समाज कल्याण विभाग
राज्य महाराष्ट्र
योजनेची सुरुवात ३ सप्टेंबर १९५९
कोणी सुरू केली केंद्र सरकार / महाराष्ट्र राज्य शासन
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील नागरिक
लाभ ३ लाख रुपये प्रोत्साहन रक्कम
योजनेचा उद्देश समाजातील जात / धर्म भेदभाव नष्ट करणे.
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन

आंतरजातीय विवाह योजना उद्देश

Inter Caste Marriage Scheme Maharashtra Purpose

  • समाजात होणारा जात,धर्म भेदभाव नष्ट करून सर्वाना समान हक्क देण्याच्या उद्देश्याने तसेच आंरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • राज्यातून जाती धर्म भेदभाव नष्ट करणे.
  • समाजात जाती धर्माबद्दल असलेला गैर समज नष्ट करणे.
  • नवं जोडप्यास आर्थिक सहाय्य करणे हे आंतरजातीय विवाह योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे हा आंतरजातीय विवाह योजनेचा उद्देश आहे.
  • नागरिकांना सशक्त तसेच आत्मनिर्भर बनविणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • जीवनस्तर सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरवात करण्यात आली आहे.
  • प्रत्येक धर्माला समान स्थान देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे

आंतरजातीय विवाह योजनेची वैशिष्ट्ये

Inter Caste Marriage Scheme Features

  • आंतरजातीय विवाह योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनद्वारे करण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र शासनाकडून सुरु करण्यात आलेली आंतरजातीय विवाह योजना एक अत्यंत महत्वाची अधिक एक योजना आहे.
  • आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील आंतरजातीय विवाहास राज्य शासनाकडून ५००००/- रुपये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या माध्यमातून २.५ रुपये असे दोन्ही मिळून ३ लाख रुपये लाभार्थी वधू-वरास दिले जातात.
  • आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून जातिगत भेदभाव कमी करून प्रत्येक धर्माला समान स्थान देणे आहे.
  • या योजनेच्या सहायाने राज्यातील नागरिक सशक्त व आत्मनिर्भर होण्यास मदत होईल.
  • राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
  • राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी प्रोत्साहन रक्कम DBT च्या सहाय्याने थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाते.
  • या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन करण्यात आली आहे त्यामुळे अर्जदारास कोणत्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही जेणेकरून अर्जदाराचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.

आवश्यक आहे.

आंतर जातीय विवाह योजनेच्या अटी

Inter Caste Marriage Scheme Maharashtra Terms & Condition

  • फक्त महाराष्ट्रातील नागरिकांनाच आंतर जातीय विवाह योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना आंतर जातीय विवाह योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • लाभार्थी विवाहित जोडप्यांपैकी एक जण (मुलगा किंवा मुलगी) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांपैकी असावा.
  • आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम फक्त त्याच लाभार्थ्यांना आहे ज्यांनी अनुसूचित जाति प्रवर्गातील मुलगा किंवा मुली सोबत विवाह केला आहे.
  • केवळ अशा जोडप्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल ज्यांचा विवाह हिंदू विवाह अधिनियम कायदा 1955 किंवा विशेष विवाह अधिनियम कायदा 1954 अंतर्गत झाला असेल.
  • या योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या मुलाचे वय २१ वर्ष व मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना कोर्ट मॅरेज करणे अनिवार्य आहे.
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष मागासवर्गीय यापैकी एक व्यक्ती (मुलगा किंवा मुलगी) व दुसरी व्यक्ती (मुलगा किंवा मुलगी) हिंदू लिंगायत जैन शीख बौद्ध असल्यास हा विवाह आंतरजातीय विवाह मानण्यात येईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय यामधील आंतर प्रवर्गातील विवाहास आंतरजातीय विवाह मानण्यात येईल
  • अर्जदाराने या आधी जर केंद्र सरकार किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अधिकारी, जिल्हा परिषद / मुंबई शहर व उपनगरासाठी समाज कल्याण अधिकारी कार्यालयात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरुन योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत अर्जासोबत जोडावी व सदर अर्ज जमा करावा अशाप्रकारे तुमचे ऑफलाइन रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
  • अर्ज जमा केल्याची संबंधित कार्यालयाकडून पोचपावती घ्यावी.

आंतरजातीय विवाह योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

Inter Caste Marriage Scheme Online Registration Process

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी जोडप्याला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यावर आंतरजातीय विवाह योजना दिसेल त्याला क्लिक करावे. क्लिक केल्यावर एक नवीन पेज ओपन होईल.
  • नवीन पेजवर एक रजिस्टेशन अर्ज असेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती (मुलाचे संपूर्ण नाव, मुलीचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, जात, लग्नाची तारीख, आधार क्रमांक इत्यादी) भरावी व योग्य ती कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करावीत आणि अर्ज सबमिट करावा.
  • अशाप्रकारे तुमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.