स्थानिक मूलचेरा नगरपंचायत नगरीतील मुलचेरा टोला येथे स्थानिक नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ” आरोग्य तपासणी तथा औषध वितरण शिबिर, उद्घाटन सोहळा दिनांक 9 फेब्रुवारी 2023 स्तळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलचेरा टोला येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ललित कुमार शनवारे राष्ट्रीय सेवा योजना सह समन्वयक अधिकारी म्हणून उपस्थित होते, तसेच कार्यक्रमात उद्घाटक म्हणून श्री गौरव बाला, शिवसेना तालुका अध्यक्ष मुलचेरा, प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामीण रुग्णालय मूलचेरा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ललित मलिक उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जावेद शेख तालुका आरोग्य अधिकारी मुलचेरा हे उपस्थित होते.
शिबिरास सर्वतोपरी सहायता करण्याचे आश्वासन श्री गौरव बाला तालुका अध्यक्ष मुलचेरा यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ते शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ग्रामस्थांच्या आरोग्य सेवेसाठी संपूर्ण वैद्यकीय नेहमी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन डॉक्टर ललित मलिक यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक गौतम वाणी यांनी केले.