ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

समाजप्रबोधनाचे नवभारत टाइम्सचे कार्य मोलाचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वांद्रे येथे नवभारत टाइम्सच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘एनबीटी उत्सव 2023’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सिवा कुमार सुंदरम, पार्था सिन्हा व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा नवभारत टाइम्सचा हा उपक्रम स्तुत्य आहे. वाचकांची गरज आणि आवड जोपासत वाटचाल करत असल्याने नवभारत टाइम्स वाचकांमध्ये लोकप्रिय आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संबंधित क्षेत्रात अत्यंत मेहनतीने आपले स्थान निर्माण करत मुंबईसह देशाचे नावही मोठे केले असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल म्हणाले, विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्याचा नवभारत टाइम्सचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. मुंबईच्या वैविध्यपूर्ण लोकजीवनात हिंदी दैनिकाचे महत्व अनन्यसाधारण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक क्षेत्रांतील प्रलंबित विषय मार्गी लागत आहेत. हाॅलमार्क संदर्भातील कायदा लागू झाला. ग्राहकांच्या हित रक्षणासाठी शासन सदैव तत्पर असल्याचेही श्री गोयल यांनी सांगितले.

यावेळी कला क्षेत्रातील जावेद अख्तर, शबाना आझमी, कार्तिक आर्यन, वरुण धवन, काजोल, आनंद एल राय, कृती सेनन, वाणी कपूर, सान्या मल्होत्रा,अदिती राव हैदरी, मनिष पाॅल, अपारशक्ती खुराना, विक्रांत मेसी, भुवन बाम, नेहा बॅनर्जी, कविता सेठ,काविश सेठ यांना सन्मानित करण्यात आले.

सामाजिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल भगवानजी रयानी, आबिद सुरती, लितिशा बगडिया व प्रदीप त्रिपाठी यांना सन्मानित करण्यात आले.

‘बिझनेस’ क्षेत्रातील हर्ष गोयनका, विजय केडिया, प्रदीप राठोड, जगदीश कुमार गुप्ता, देविता सराफ यांना सन्मानित करण्यात आले.