NEET 2023 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात
NEET 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल आहे. प्रवेश परीक्षा ७ मे, रविवारी होणार आहे.
सर्व उमेदवारांसाठी NEET चे अर्ज शुल्क वाढले आहे. सर्वसाधारण उमेदवारांना आता परीक्षेला बसण्यासाठी ₹१,७००/- भरावे लागतील. जनरल-EWS/OBC-NCL उमेदवारांसाठी फी १,६००/- रुपये आहे, SC/ST/PWBD/Transgender उमेदवारांसाठी फी १०००/- रुपये आहे. भारता बाहेरील सर्व उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ₹९,५०० आहे. सर्व अर्जदारांना जीएसटी आणि प्रक्रिया शुल्क भरावे लागेल जे परीक्षा शुल्काव्यतिरिक्त असेल.