ग्रामीण भागातील सर्वच मुलींना शिक्षण घेता यावे याकरीता गाव ते शाळा दरम्यान मानव विकास कार्यक्रम अंतर्गत शासनाकडून बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत जिल्हयाकरीता उपलब्ध बसेस, प्रत्यक्ष सुरू असलेल्या बसेसची संख्या आणि बसेसचे आर्युमान लक्षात घेऊन शासनाने गडचिरोली जिल्हयासाठी 55 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हयाच्या ग्रामीण भागातील विद्यार्थींना दिलासा मिळणार आहे. लवकरच या बसेस विद्यार्थीनींच्या सेवेसाठी गडचिरोलीत दाखल होणार आहेत.
सदर बसेसच्या खरेदीची कार्यवाही राज्य परिवहन महामंडळावतीने करण्यात येणार आहे. यासाठी गडचिरोली जिल्हयासाठी प्रती बस अंदाजीत 40 लाख याप्रमाणे 55 बसेससाठी 22 कोटी रूपये खर्च होणार आहे. मानव विकास अंतर्गत अंतर्गत यापुर्वी गडचिरोली जिल्हयासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या बसेसची संख्या, प्रत्यक्ष सुरू असलेल्या बसेसची संख्या, बसेसचे आर्युमान 10 वर्ष किंवा 6.50 लाख किमी झाले असल्याने याबाबी विचारात घेऊन शासनाने 55 अतिरिक्त बसेस खरेदीसाठी मान्यता दिली आहे.