ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

पोलीस शिपाई संवर्गातील सन २०२१ मधील रिक्त पदे १००% भरण्यासाठी नवीन शासन निर्णय जारी

राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन २०२१ मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गात सुमारे ११४४३ इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत.

दरम्यान वित्त विभाग, शासन निर्णय क्र. पदनि २०२२/प्र.क्र.२/२०२२/ आ.पु.क., दि.१२/०४/२०२२ अन्वये पदभरतीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या असून यामध्ये सुधारीत आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे.

सद्यस्थितीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील १०० % रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने शासन निर्णय, वित्त विभाग दि. १२/०४/२०२२ च्या तरतूदीमधून सूट मिळण्यासाठीच्या प्रस्तावास दि. २७/०९/२०२२ रोजीच्या बैठकीमध्ये मा. मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मा.मंत्रिमंडळाच्या दि.२७/०९/२०२२ रोजीच्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२१ मधील पोलीस शिपाई गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता वित्त विभाग, शासन निर्णय दि. १२/०४/२०२२ मधील तरतूदींमधून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. शासन निर्णय

राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई, गट-क या संवर्गातील सन २०२१ या वर्षात विविध कारणास्तव रिक्त झालेली पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण ११४४३ पदे १०० % भरण्यास शासन निर्णय, वित्त विभाग क्र. पदनि ०२२/प्र.क्र.२/२०२२ / आ.पु.क., दि.१२/०४/२०२२ मधील तरतुदींमधून सूट देण्यात येत आहे.

प्रस्तुत प्रस्तावासाठी येणारा खर्च यासाठी मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. तसेच याद्वारे कोणतीही नवीन पद निर्मिती अपेक्षित नसून मंजूर पदांच्या मर्यादेत रिक्त पदे भरण्यात यावीत असे शासन निणर्यामध्ये नमूद केले आहे.

शासन निर्णय: पोलीस शिपाई संवर्गातील सन 2021 मधील रिक्त पदे 100 भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट मिळण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.