ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती सुरू; 10वी, 12वी, ITI व पदवीधरांना उत्तम संधी!

राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Thane) ठाणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. NHM Thane अंतर्गत सुपर स्पेशालिस्ट, दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल फिकॉलॉजिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, आहारतज्ञ, समुपदेशक, मानसोपचार परिचारिका, लेखापाल, MTS, तंत्रज्ञ आणि इतर पदांच्या 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे

NHM Thane Application 2022 : या भरती बाबतची अधिसूचना (National Health Mission Thane) यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 नोव्हेंबर 2022 (05:00 PM) आहे. नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक व शेवटपर्यंत वाचावी.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, सुविधा व्यवस्थापक ई- सुश्रुत, आहारतज्ञ, समुपदेशक, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, मानसोपचार परिचारिका, फिजिओथेरपिस्ट, सांख्यिकी अन्वेषक, कार्यक्रम सहाय्यक डीईओ, लेखापाल, पॅरा मेडिकल वर्कर, एमटीएस (मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक),

हृदयरोगतज्ज्ञ (सुपर स्पेशालिस्ट), नेफ्रोलॉजिस्ट (सुपर स्पेशालिस्ट), स्त्रीरोगतज्ञ (विशेषज्ञ), बालरोगतज्ञ (विशेषज्ञ), सर्जन (विशेषज्ञ), रेडिओलॉजिस्ट (विशेषज्ञ), भूलतज्ज्ञ (विशेषज्ञ), फिजिशियन (विशेषज्ञ), ऑर्थोपेडिक (विशेषज्ञ), नेत्ररोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट (NMHP),

दंत तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, कोल्ड चेन तंत्रज्ञ, दंत स्वच्छता, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, बीएसयू तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, STS (वरिष्ठ उपचार एसटी पर्यवेक्षक), STLS (वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक), स्टाफ नर्स इत्यादि पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत.

पदसंख्या : एकूण 280 जागा

 शैक्षणिक पात्रता : (नर्सिंग)/पदवीधर/10वी/ITI/12वी/ DMLT DM/MD/BDS/MBBS/BAMS/BUMS/BHMS/MCA/MA/BCA/MSW/GNM/B.Sc. (अधिक सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली मूळ जाहिरात PDF वाचावी.)

  •  नोकरी ठिकाण – ठाणे (महाराष्ट्र)
  •  पगार : दरमहा 15,500/- रुपये ते 1,25,000/- रुपये पदानुसार मिळेल.
  •  वयोमर्यादा :
  • खुला प्रवर्ग – किमान 18 ते 38 कमाल वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्ग – किमान 18 ते 43 कमाल वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ, अतिविशेषतज्ञ – 65 कमाल वर्षे
  • इतर पदे (परिचारिका, अधिपरिचारिका, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता) – 65 कमाल वर्षे
  • MBBS, स्पेशालिस्ट – 70 कमाल वर्षे

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग –> रु. 300/-
  • मागासवर्गीय –> रु. 200/-
Important Links For NHM Thane Application 2022 | (NHM Thane) भरतीचा अर्ज (Application Form) डाउनलोड करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन
 अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 21 नोव्हेंबर 2022 (05:00 PM)
 अर्ज सादर करण्याचे ठिकाण : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, 04था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे