राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने आज सकाळी PFI शी संबंधित असलेल्या ७/११ मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील वाहिद शेखच्या घरावर धाड टाकली.
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आज पहाटे अब्दुल वाहिद शेख यांच्या विक्रोळी येथील निवासस्थानावर छापा टाकला. वाहिद शेख यांची ७/११ मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार वाहिद शेख हा ‘इनोसंट नेटवर्क’ ही संस्था चालवत असून तो पीएफआयशी संबंधित होता.
एनआयएने पीएफआयचे मॉड्यूल नष्ट करण्यासाठी आज सकाळपासून महाराष्ट्र, यूपी, राजस्थान, तामिळनाडू आणि दिल्लीसाह विविध राज्यात धाडी टाकल्या. एनआयएने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील पाच ठिकाणी आज सकाळी छापे टाकले. मुंबईच्या विक्रोळी येथील अब्दुल वाहिद शेखच्या निवासस्थानावर देखील छापेमारी करण्यात आली. या सोबतच एनआयएच्या पथकाने भिवंडी, मुंब्रा आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये आज मोठी कारवाई केली.
Afghanistan Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी अफगाणिस्तान पुन्हा हादरले, ६.३ तिव्रतेची नोंद; ४ हजार नागरिक ठार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयचे कार्यकर्त्यांनी अनेक नव्या नावांनी संस्था तयार केल्या असून त्याद्वारे अनेक समाजविघातक कारवाया करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. या द्वारे PFI पुन्हा नव्याने कार्यरत करण्याचा डाव असल्याचे पुढे आले आहे. त्यांच्या अनेक संशयास्पद कारवायावर एनआयएचे लक्ष आहे. या माध्यमातून PFI साठी निधी उभारणी केली जात असल्याच्या संशयामुळे NIA ने आज केलेल्या छापेमारीत वेगवेगळ्या ठिकाणांहून अंदाजे ७ ते १० व्यक्तींना अटक केली आहे.