गडचिरोली: सर्व जनतेस तसेच प्रवासी बस मालक व चालक यांना सुचित करण्यात येते की, गडचिरोली जिल्हयातील खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्याठिकाणापासून कि.मी.प्रमाणे बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भांडे बाबतचा विहित नमुना तक्ता तयार करुन व त्याप्रमाणे येणारा प्रति आसन दर दर्शवून सदर खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी प्रसिध्द करणे व प्रवाशांचा माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक देखील प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना प्रवास करतांना कोणतीही अडचण आल्यास dyrto.33-mh@gov या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदवावी यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,गडचिरोली यांनी केले आहे.
Related Articles
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ ‘माहिती व जनसंपर्क’तर्फे अनोखी मानवंदना माहितीपट आणि चित्रपटाचे महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन प्रसारण होणार
मुंबई, दि. ४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ शुक्रवार, दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपट आणि चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे. ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे […]
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सर्व लाभार्थींना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्याचे वितरण डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 साली लोकहितार्थ केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अतिरिक्त अन्न सुरक्षा बहाल करण्याच्या अनुषंगाने, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला, सातव्या टप्प्यांतर्गत आणखी तीन महिन्यांची (ऑक्टोबर ते डिसेंबर […]