ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महसूल विभागातील लिपिक टंकलेखक (महसूल सहाय्यक) गट-क संवर्गातील सरळसेवा कोटयातील रिक्त पदे भरण्या बाबत सूचना

राज्य शासकीय कार्यालयातील गट – क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे यापूढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला असल्याने विहित नमुन्यातील सविस्तर मागणीपत्र शासनास सादर करण्याबाबत शासन पत्रान्वये यापूर्वी कळविण्यात आले आहे.

दि. १.१.२०२३ ते दि. ३१.१२.२०२३ या कालावधीत नियोजित स्पर्धा परीक्षांचा अंदाजित कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आला असून, स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाने उपलब्ध करुन दिले आहे ( प्रत सोबत ). त्यानुसार लिपिक – टंकलेखक संवर्गातील पदे ” महाराष्ट्र राजपत्रित गट – ब व गट – क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ” मधून भरावयाचे प्रस्तावित असून, त्याकरीता जाहिरात जानेवारी, २०२३ च्या पहिल्या आठवड्यात प्रसिध्द होणार असल्याने त्यासंबंधातील पदांचे मागणीपत्र पाठवितांना सद्या रिक्त असलेली पदे व नजिकच्या काळात पदोन्नती / सेवानिवृत्ती इत्यादी बाबींमूळे रिक्त होणारी पदे विचारांत घेण्याचे आयोगाने कळविले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगास मागणीपत्र सादर करताना पुढील माहिती व कागदपत्रांसह पाठविण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने संदर्भाधीन क्र .१ येथील पत्राद्वारे दिल्या आहेत . त्यानुसार महसूल विभागातील क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक टंकलेखक ( महसूल सहायक ) गट – क संवर्गातील सरळसेवा कोटयातील मागणीपत्र पाठवितांना शासनपत्र दि. ९.११.२०२२ मधील सूचना तसेच खालील सूचना विचारांत घेवून विहित नमुन्यातील सविस्तर मागणीपत्र शासनास दि. ८.१२.२०२२ पर्यंत सादर करण्याची दक्षता घ्यावी.

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि. ०२.११.२०२२ नुसार विहित कार्यपध्दत तसेच नमून्यामध्ये परिपूर्ण मागणीपत्र पाठविण्यात यावे.

शासन राजपत्रात प्रसिध्द केलेल्या अद्ययावत सेवाप्रवेश नियम तसेच कर्तव्य व जबाबदाऱ्यांची प्रत पाठविण्यात यावी.

विहित सामाजिक प्रवर्ग तसेच मागासवर्ग, महिला, खेळाडू. दिव्यांग ( विकलांग ), अनाथ इत्यादी समांतर आरक्षणासंदर्भातील माहिती.

शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. दिव्यांग -२०१९ / प्र.क्र.२५१ / दिक २. दि. ०२.०२.२०२१ अन्वये विहित कार्यपध्दतीनुसार दिव्यांग व्यक्तींसाठी पदे सुनिश्चित केल्याबाबत अथवा अपवाद केल्याबाबतच्या शासन आदेशाची प्रत.

मागणीपत्रामधील एकूण पदांपैकी सामाजिक आरक्षणांतर्गत भरावयाची पदे ५०% पेक्षा जास्त आरक्षित असल्यास, मागील अनुशेषाच्या व चालू पदांकरीता स्वतंत्र मागणीपत्र.

उपरोक्त माहितीसह सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि.०२.११.२०२२ व दि.०२.१२.२०२१ अन्वये विहित कार्यपध्दतीनुसार सक्षम प्राधिका-यांच्या मान्यतेसह रिक्त पदांचे विहित नमुन्यातील मागणीपत्र दि.०८.१२.२०२२ पर्यंत शासनास सादर करावे.

मागणीपत्र पाठवितांना काही कार्यालये बिंदूनामावली एकत्रित असल्याचे कारण दर्शवून इंग्रजी व मराठी लिपिक – टंकलेखकांसाठी स्वतंत्र विवरणपत्रात मागणीपत्र न पाठविता एकत्रित मागणी सादर करतात. बिंदूनामावली जरी एकत्रित असली तरी इंग्रजी व मराठी लिपिक – टंकलेखकांसाठी एकत्रित मागणीपत्र न पाठविता ते स्वतंत्र विवरणपत्रात सादर करावे.

विहित दिनांकापर्यंत परिपूर्ण लिपिक – टंकलेखक ( महसूल सहाय्यक ) संवर्गाचे मागणीपत्र शासनास प्राप्त न झाल्यास सन २०२३ मध्ये संबंधित कार्यालयाची पदे भरावयाची नाहीत, असे समजण्यात येईल. तसेच स्पर्धा परीक्षांच्या सन २०२३ च्या अंदाजित वेळापत्रकामध्ये संबंधित कार्यालायातील रिक्त पदांचा समावेश करण्यात येणार नाही. परिणामी सदर संवर्ग / पदावरील भरतीसाठी सन २०२३ मध्ये आयोगास भरतीप्रक्रीया राबविणे शक्य होणार नाही. याची नोंद घ्यावी,.

प्रकरणी आवश्यक त्या समन्वयासाठी संबंधित उपायुक्त ( महसूल ) यांची त्यांच्या महसुली विभागाकरीता समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांनी त्यांच्या विभागातील सर्व जिल्ह्यांकडून मागणीपत्र प्राप्त करुन घेवून एकत्रितरित्या दि. ८.१२.२०२२ पर्यंत निश्चितपणे सादर करण्याची दक्षता घ्यावी.